"जवस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Jawas_pik.JPG|right|thumb|जवसाचे पिकशेत]]
[[चित्र:Linum usitatissimum capsules, vlas zaadbollen.jpg|thumb|जवसबियांच्या कोषिका]]
[[चित्र:Brown Flax Seeds.jpg|thumb|150px|right|जवसजवसाच्या बिया]]
'''जवस''' हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात. भारतात जवस हे हिवाळ्यातले (रब्बीचे) पीक आहे. हे धान्य मूळचे इजिप्तचे. या वनस्पतीला इंग्रजीत Common Flax किंवा Linseed म्हणतात. शास्त्रीय नाव Linum usitatissimum. याच्या एका फळात दहा टोकदार चकचकीत चपट्या बिया असतात. त्या बियांपासून तेल निघते. तेलाचे इंग्रजी नाव Linseed Oil. विदर्भात जवसाचे तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. याच्या वापराने दृष्टी मंदावते आणि नपुंसकत्व येते असा समज आहे. जवसाच्या बियांची भुक्की करून चविष्ट चटणी करतात.
'''जवस''' ही उगवणारी एक औषधी वनस्पती आहे. तिच्या बियांपासून तेल काढतात. जवसाचे तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरतात.
 
जव(यव, सातू, Barley, बार्ली) हे धान्य जवसापेक्षा वेगळे आहे. त्याचे शास्त्रीय नाव Hordeum vulgare किंवा Hordeum sativum असे आहे. हे गळिताचे धान्य नाही.
 
खोडाच्या अंतर्सालीपासून धागा निघतो.
 
 
तेलाचे उपयोग : हे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याचे पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी अणि खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.
 
 
== औषधी गुणधर्म ==
बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते आणि जखमा भरण्यास उपयोगी पडते. फुले मेंदू आणि हृदयासाठी पौष्टिक. युनानी वैद्य अंतर्गत जखमांसाठी बियांचे सेवन करण्यास सांगतात तर त्याच बियांचा गजकर्णादी वापर त्वचारोगांवर बाह्योपचाराने करतात. चुन्याच्या निवळीत मिसळलेले तेल हा कातडीच्या भाजण्यावरचा फायदेशीर उपाय आहे.
जवस खोकल्यावर आराम पडण्यासाठी गुणकारी असतात.
 
== हेही पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जवस" पासून हुडकले