"मराठी भाषा दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|मराठी भाषा गौरव दिन}}
'''मराठी भाषा दिन''' किंवा '''मराठी राजभाषा दिन''' हा १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आल्यामुळे हा दिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. राजभाषा मराठीचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत घेतलेल्या ५ जुलै १९६०च्या निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले. 'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल असे घोषित करण्यात आले. तशी ती १ मे १९६० पासून होतीच. मराठी भाषा दिनाला '''जागतिक मराठी भाषा दिन''' असेही म्हणतात.
 
[[ज्ञानपीठ पुरस्कार]] विजेते मराठी कवी [[कुसुमाग्रज]] यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जानेवारी २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस "२७ फेब्रुवारी" हा "[[मराठी भाषा गौरव दिन]]" म्हणून घोषित केला. मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.