"बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३३१:
अस्पृश्यांना कोणतेही राजकीय अधिकार नसतानाही त्याना [[इ.स. १९३०]] मध्ये [[लंडन]] येथे भरलेल्या पहिल्या [[गोलमेज परिषद]]ेस अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रण दिले गेले. या परिषदेत त्यांनी भारतातील अस्पृश्यांच्या परिस्थितीबद्दल आवाज उठवला आणि अस्पृश्यता निर्मूलनाची मागणी केली. त्यांनी पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांमध्ये दलित वर्गाच्या मूलभूत हक्कांचा एक जाहीरनामा तयार केला आणि अल्पसंख्याकांसाठी नेमलेल्या समितीसमोर सादर केला. त्या जाहीरनाम्यात अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. हा जाहिरनामा ब्रिटिश सरकारने मान्य केला. परंतु [[महात्मा गांधी]] यांनी स्वतंत्र्य मतदार संघाच्या संकल्पनेस प्रखर विरोध केला व [[पुणे]] येथील [[येरवडा कारागृह|येरवडा कारागृहात]] त्याविरुद्ध आमरण उपोषण सुरू केले. याचे पर्यवसान [[पुणे करार|पुणे करारात]] झाला.<ref name="auto39">{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३|language=मराठी}}</ref>
 
=== स्वतंत्र मजूर पक्षपक्षाची स्थापना, आणि मुंबई विधानसभेचे सदस्य व विरोधी पक्षनेते ===
{{मुख्यलेख|स्वतंत्र मजूर पक्ष}}
'कोणत्याही समाजात त्या देशातील सर्वसामान्य जनतेचा जीवनमार्ग हा राजकीय परिस्थितीने घडविलेला असतो. राजकीय सत्ता जनतेच्या आकांक्षांना मूर्त रूप देत असते. ती ज्यांच्या हातात असते त्यांना आपल्या आशा-आकांक्षांना मूर्त रूप देण्याची संधी प्राप्त होते. सत्ता त्यांचीच बटीक बनत असते.' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणले. “या देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व भांडवलदार, जमिनदार व ब्राह्मणवर्ग यांच्या हातात असल्याने, राजकीय सत्ता त्यांच्याच हाती जाईल व येथील दलित कष्टकरी समाज गुलामासारखा राबविला जाईल,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होते. असे होऊ नये यासाठी त्यांनी लोकशाही मूल्यांवर आधारित असणारा 'स्वतंत्र मजूर पक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला.<ref>{{स्रोत पुस्तक|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष जडण घडण आणि धोरण|last=कीर्ती|first=विमल|publisher=प्रबोधन प्रकाशन|year=२५ डिसेंबर १९७९|isbn=|location=नागपूर|pages=१५ (प्रथम आवृत्ती)}}</ref> अस्पृश्य वर्गांची स्वतंत्र्य राजकीय ओळख प्रस्थापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. १९३६ मध्ये [[स्वतंत्र मजूर पक्ष]]ाची (इंडिपेन्डन्ट लेबर पार्टी) स्थापना केली.<ref name="auto39" /> [[फेब्रुवारी १७|१७ फेब्रुवारी]] [[इ.स. १९३७|१९३७]] मध्ये [[मुंबई इलाखा|मुंबई इलाख्याच्या]] प्रांतिक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रयत्नांमुळे या पक्षाचे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले. १५ विजयी उमेदवारांपैकी १३ स्वतंत्र मजूर पक्षाचे तर २ हे स्वतंत्र मजूर पक्षाने पाठिंबा दिलेले उमेदवार होते. पक्षाला मिळालेले हे यश सर्वाधिक होते.<ref name="auto53">{{Cite web|url=https://www.loksatta.com/wanchitanche-vartaman-news/sukhadeo-thorat-article-about-ambedkar-movement-1749355/|title=विचारधारेपासून दुरावणारी आंबेडकरी चळवळ|date=13 सप्टें, 2018}}</ref><ref>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=1-85065-449-2 |pages=76–77 }}</ref> यावेळी आंबेडकरांची सुद्धा मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून निवड झाली. सन १९४२ पर्यंत ते विधानसभेचे सदस्य राहिले आणि यादरम्यान त्यांनी मुंबई विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.<ref>{{Cite book|title=Dr. Bhimrao Ramji Ambedkar (Vol. 7)|last=Khairmode|first=Changdev Bhawanrao|publisher=Maharashtra Rajya Sahilya Sanskruti Mandal, Matralaya|year=1985|isbn=|location=Mumbai|pages=245|language=Marathi}}</ref><ref>{{cite book |last1=Jaffrelot |first1=Christophe |title=Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste |year=2005 |publisher=C. Hurst & Co. Publishers |location=London |isbn=978-1-85065-449-0 |pages=76–77 }}</ref><ref name="auto39" />