"महाराष्ट्रातील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Additional info
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५०:
 
== राजकारण ==
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदार संघापैकी ६३ मतदार संघांत बौद्ध व अनुसुचित जातीचा प्रभाव आहे.
 
विविध समाजगटांना, समूहांना, जातींना प्रतिनिधित्व देणारे प्रमुख राजकीय पक्ष लोकसभा निवडणूकीत राज्यात लोकसंख्येने बौद्ध समाजाला कमी उमेदवारी देतात. महाराष्ट्रातील बौद्ध समाज हा मुख्यत: आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीशी जोडलेला आहे. आणि तो रिपाइंच्या प्रमुख चार गटांत तो विभागला गेला आहे. तसेच बौद्ध समाजातील काही लोक हे थेट काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, बसप यांसारख्या राजकीय पक्षांत प्रवेश करून काम करीत आहेत. मात्र, बहुसंख्य बौद्ध व अन्य दलित जातीतील आंबेडकरी चळवळीला मानणारा समाज हा रिपाइंच्या माध्यमातून आपले राजकारण करीत आहे. आजवर रिपाइं गटांचे राजकारण हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांबरोबर राहिले आहे. त्यामुळे हा बहुसंख्य बौद्ध समाज रिपाइंच्या माध्यमातूनही युती करून दोन्ही काँग्रेसबरोबर राहिलेला आहे. तसेच त्यातील काही भाग हा सेना-भाजपसोबतही आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइंच्या सर्वच गटांना, त्यांच्या नेत्यांना ज्या प्रकारे पराभवाला सामोरे जावे लागले, युती-आघाडी केलेल्या पक्षांकडूनच घात झाला होता, त्यानुसार प्रस्थापित पक्षांनी जाणीवपूर्वक रिपब्लिकन नेत्यांचा पराभव केला होता हे मानले जाते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत रिपाइं नेते [[रामदास आठवले]] थेट भाजपसोबत जाऊन महायुतीत दाखल झाले आहेत, तर [[वंचित बहुजन आघाडी]]चे नेते [[प्रकाश आंबेडकर]] व रिपाइंचे नेते डॉ. [[राजेंद्र गवई]] यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करुन निवडणुका लढवल्या आहेत. दोन्ही काँग्रेस यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. [[जोगेंद्र कवाडे]] व बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्ष [[सुलेखा कुंभारे]] यांचा पाठिंबा काँग्रेसने, तर रिपाइंच्या [[उपेंद्र शेंडे]] व [[गंगाधर गाडे]] गटाचा राष्ट्रवादीने पाठिंबा मिळवला होता, मात्र त्या बदल्यात त्यांना लोकसभेच्या जागा सोडण्यात आल्या नव्हत्या.