"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ६०३:
१९२० च्या दशकात आंबेडकर विद्यार्थी म्हणून [[लंडन]]मध्ये ज्या इमारतीत राहिले, ती वास्तू [[महाराष्ट्र सरकार]]ने विकत घेऊन त्याला संग्रहालयाचे रूप देत त्यांचे रूपांतर [[डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्मारक]] म्हणून केले गेले आहे.<ref>[http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html Maharashtra government buys BR Ambedkar's house in London] {{webarchive|url=https://web.archive.org/web/20160425144149/http://www.hindustantimes.com/india/maharashtra-government-buys-br-ambedkar-s-house-in-london/story-y2c9YAdgdEOzUPWH1lcXHM.html |date=25 April 2016 }}, Hindustan Times, 27 August 2015.</ref>
 
सन २०१२ मध्ये, सीएनएन आयबीएन, हिस्ट्री टिव्ही१८ व आऊटलुक इंडिया यांच्याद्वारे घेण्यात आलेच्या "[[द ग्रेटेस्ट इंडियन]]" नावाच्या सर्वेक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी ठरले. आंबेडकरांना आधुनिक भारतातील 'सर्वात महान भारतीय' किंवा 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून घोषित केले गेले. या सर्वेक्षणात २८ परिक्षक (ज्युरी) आणि देश-विदेशातील २० कोटीपेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=The Greatest Indian after Independence: BR Ambedkar |url=http://ibnlive.in.com/videos/282480/the-greatest-indian-after-independence-br-ambedkar.html |publisher=IBNlive |date=15 August 2012 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20121106012934/http://ibnlive.in.com/videos/282480/the-greatest-indian-after-independence-br-ambedkar.html |archivedate=6 November 2012 |df=dmy-all}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत |title=The Greatest Indian |url=http://www.historyindia.com/TGI/ |publisher=historyindia |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20120808090032/http://www.historyindia.com/TGI/ |archivedate=8 August 2012 |df=dmy-all}}</ref> २००७ झालेल्या सर्वेक्षणात '६० सर्वश्रेष्ठ भारतीयां'मध्येही आंबेडकरांचा समावेश होता.<ref>https://www.indiatoday.in/magazine/cover-story/story/20080421-60-greatest-indians-736022-2008-04-11</ref>
 
आंबेडकरांच्या राजकीय तत्त्वज्ञानाने मोठ्या संख्येने राजकीय पक्ष, प्रकाशने आणि कामगार संघटनांचा उगम झाला आहे, ज्या संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात सक्रिय आहेत. बौद्ध धर्माबद्दलच्या त्यांच्या प्रबंधामुळे भारताच्या लोकसंख्येतील मोठ्या वर्गांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल रूची वाढली आहे. सन १९५६ मधील आंबेडकरांच्या नागपूर येथील धर्मांतर सोहळ्याचे अनुकरण करत, वर्तमान काळातील मानवाधिकार कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्मांतर सोहळे आयोजित केले जातात.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.hindu.com/2007/05/28/stories/2007052806851200.htm|title=One lakh people convert to Buddhism|work=The Hindu|date=28 May 2007|deadurl=no|archiveurl=https://web.archive.org/web/20100829082828/http://www.hindu.com/2007/05/28/stories/2007052806851200.htm|archivedate=29 August 2010|df=dmy-all}}</ref> भारतीय बौद्ध अनुयायी विशेषतः नवयानी आंबेडकरांना ''[[बोधिसत्व]]'' व ''मैत्रेय'' असे संबोधतात.<ref name="Fitzgerald2003">{{स्रोत पुस्तक|author= Fitzgerald, Timothy|title= The Ideology of Religious Studies|url=https://books.google.com/books?id=R7A1f6Evy84C&pg=PA129| year=2003|publisher= Oxford University Press|isbn= 978-0-19-534715-9|page=129}}</ref><ref name="KuldovaVarghese2017">{{स्रोत पुस्तक|author=M.B. Bose|editor=Tereza Kuldova and Mathew A. Varghese|title=Urban Utopias: Excess and Expulsion in Neoliberal South Asia |url=https://books.google.com/books?id=6c9NDgAAQBAJ&pg=PA144 |year=2017|publisher=Springer|isbn=978-3-319-47623-0|pages=144–146}}</ref><ref>{{harvtxt|Michael|1999}}, p. 65, notes that "The concept of Ambedkar as a Bodhisattva or enlightened being who brings liberation to all backward classes is widespread among Buddhists." He also notes how Ambedkar's pictures are enshrined side-to-side in Buddhist Vihars and households in India|office = [[Viceroy's Executive Council|Labour Member in Viceroy's Executive Counciln]] Buddhist homes.</ref>
 
[[राजर्षी शाहू महाराज]]ांनी आंबेडकरांना '[[लोकमान्य]]' ही उपाधी प्रदान केली होती. आंबेडकरांच्या कार्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी त्यांना लिहिलेल्या एका पत्रात 'रा. लोकमान्य आंबेडकर' असा मायना महाराजांनी लिहिला होता.<ref>{{Cite book|title=राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व शिक्षणकार्य|last=भगत|first=रा.तु.|publisher=रिया पब्लिकेशन्स|year=२०१६|isbn=|location=कोल्हापुर|pages=६४|language=मराठी}}</ref>
 
आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये सुद्धा दिसतो.<ref>https://www.bbc.com/marathi/amp/india-46472649</ref> आंबेडकरांच्या हयातीत त्यांचा देशातील सर्वसामान्य लोकांवर प्रभाव होता, त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हा प्रभाव कायम राहिला. तसेच त्यांच्या विचारांचा जगात सर्वत्र प्रचार होत आहे. आंबेडकरांचे [[तत्त्वज्ञान]] [[आंबेडकरवाद]] हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. त्यांच्या विचारांमुळे तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित-पीडित जनता जागृत होत आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानातून इतर देशातील शोषित लोकांना प्रेरणा मिळाली आहे. [[जपान]]मध्ये 'बुराकू' नावाची एक शोषित जमात आहे. या जमातीच्या नेत्यांनी भारतात येऊन आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला व त्यापासून प्रभावित झाले. ते नेते आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा बुराकू जमातीत प्रसार करीत आहे. बुराकू जमात ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपले प्रेरणास्थान मानते. [[युरोप]]ाचे ह्रदय समजल्या जाणाऱ्या [[हंगेरी]] देशातील [[रोमा जिप्सी|जिप्सी]] लोकांचे नेते जानोस ओरसोस यांच्यावरही आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यांनी आंबेडकरांचे विचार जिप्सो लोकांमध्ये पेरून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणले.<ref name=":1">{{Citation|last=Bouddha Jiwan|title=Ambedkar in Hungary Hindi Dubbed|date=2016-11-01|url=https://m.youtube.com/watch?v=5isB43Rr5sU|accessdate=2018-03-26}}</ref> १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात, काही हंगेरियन रोमानी लोकांना स्वतःच्या परिस्थितीत आणि भारतातील दलित लोकांच्या परिस्थितीत साम्यता आढळून आली; त्यांनी आंबेडकरांच्या धर्मांतरापासून प्रेरित होऊन बौद्ध धर्मांत रूपांतरित होण्यास सुरुवात केली. हंगेरीयन लोकांनी सन २००७ मध्ये सांजाकोजा शहरात [[डॉ. आंबेडकर हायस्कूल, हंगेरी|डॉ. आंबेडकर हायस्कूल]] नावाची शाळा सुरू केली. हंगेरी देशात आंबेडकरांच्या नावाने तीन विद्यालये सुरु करण्यात आली आहेत.<ref>https://drambedkarbooks.com/2016/04/15/first-dr-ambedkar-statue-installed-at-the-heart-of-europe-hungary/</ref> या विद्यालयांत बाबासाहेबांची पुस्तके असून त्यांचे विविध चित्रे व विचारही लावण्यात आलेले आहेत. येथे विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे पाठही शिकवले जातात. त्यामध्ये बाबासाहेबांचा शिक्षणासाठीचा संघर्ष, जातिविरोधी चळवळी व भारतीय संविधान निर्मिती अमूल्य योगदान या बाबी शिकवल्या जातात. हंगेरी देशाचे शिक्षणमंत्री पालकोवीक्स यांनीही सांजाकोजा येथील शाळेला भेट दिलेली आहे. या शाळेत १४ एप्रिल २०१६ रोजी बाबासाहेबांचा अर्धपुतळाही स्थापन करण्यात आला आहे, जो हंगेरीतील [[जय भीम नेटवर्क, हंगेरी|जयभीम नेटवर्क]]ने शाळेस भेट दिला होता.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-sundaymagazine/Ambedkar-in-Hungary/article15941919.ece|title=Ambedkar in Hungary|date=2009-11-22|work=The Hindu|access-date=2018-03-26|language=en-IN|issn=0971-751X}}</ref><ref>{{स्रोत बातमी |url=http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |title=Magazine / Land & People: Ambedkar in Hungary |work=The Hindu |date=22 November 2009 |accessdate=17 July 2010 |location=Chennai, India |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20100417181130/http://www.hindu.com/mag/2009/11/22/stories/2009112250120300.htm |archivedate=17 April 2010 |df=dmy-all}}</ref>
 
२५ डिसेंबर १९५४ रोजी आंबेडकरांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या ऐतिहासीक दिनाच्या निमित्ताने २५ डिसेंबर २०१९ रोजी जवळपास एक लाख आंबेडकर अनुयायांनी महाबुद्धवंदना म्हटली.<ref>https://www.loksatta.com/pune-news/dr-babasaheb-ambedkars-followers-say-mahabuddha-vandana-msr-87-2044820/</ref>
 
=== भारतीय समाजावरील प्रभाव ===
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय समाज जीवनावर खूप प्रभाव पडलेला आहे.
* '''जातिव्यवस्थेचे उच्चाटन''' :
आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात सुमारे ५००० वर्षापासून प्रचलित असलेल्या जातिव्यवस्थेस खिंडार पाडले; तिचे उच्चाटन होण्यास चालना मिळाली. विषमतेवर आधारलेल्या जातिव्यवस्थेच्या जागी समतेवर आधारलेली [[लोकशाही]] व्यवस्था प्रस्थापित होण्यास चालना मिळाली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४|language=मराठी}}</ref>
* '''अस्पृश्यांची उन्नती''' :
डॉ. आंबेडकरांच्या कार्यामुळे हजारो वर्षापासून उच्च जातीच्या गुलामगिरीत अडकून पडलेल्या अस्पृश्यांमध्ये एकता व जागृती निर्माण झाली. अस्पृश्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झाली. परिणामी त्याच्यांत आत्मविश्वास व आत्मविष्कार निर्माण झाला. आपणच आपल्या विकासासाठी लढा दिला पाहिजे, याची जाणिव झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. आज सरकार समाजकल्याणाच्या विविध योजना राबविते. त्याचे मोठे श्रेय डॉ. आंबेडकरांच्या कार्यात जाते. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच अस्पृश्यांना शिक्षणसंस्था, कायदेमंडळ, पंचायत राज्यव्यवस्था,सरकारी नोकऱ्या इत्यादींमध्ये आरक्षण मिळाले. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांमध्ये ऊर्ध्वगामी सामाजिक गतिशीलतेस चालना मिळाली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४ व १४५|language=मराठी}}</ref>
* '''बौद्ध धर्माचा प्रसार''' :
इसवी सन पूर्व ३ऱ्या शतकात [[सम्राट]] [[अशोक]]ांच्या काळात भारताचा राज्यधर्म असलेल्या बौद्ध धर्माचा ११व्या शतकानंतर भारतात ऱ्हास घडून आला. [[बोधिसत्त्व]] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माच्या प्रसारास चालना मिळाली. [[महाराष्ट्र]], [[उत्तर प्रदेश]], [[पंजाब]], [[मध्य प्रदेश]], [[गुजरात]] व इतरही काही राज्यांत लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतरही उच्चशिक्षित लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी [[बौद्ध तत्त्वज्ञान]], [[बौद्ध साहित्य|साहित्य]] व [[पाली भाषा]] यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. इतरही अनेक उच्चशिक्षित लोक बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. त्यांनी बौद्ध [[तत्त्वज्ञान]], [[साहित्य]] व [[पाली भाषा]] यांच्या अभ्यासाची सुरूवात केली. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४५|language=मराठी}}</ref> १९५६ नंतर दरवर्षी अखंडपणे हजारों-लाखोंच्या संख्येने लोक बौद्ध धर्म स्वीकारत आहेत. २००१ ते २०११ च्या जनगणनेवरून भारतातील [[अनुसूचित जाती]]मध्ये अत्यंत वेगाने वाढणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. २०११ च्या जनगणनेनुसार, एकूण भारतीय बौद्धांत सुमारे १३% पूर्वीपासूनचे म्हणजेच पारंपारिक बौद्ध आहेत तर ८७% [[नवयान]]ी बौद्ध किंवा [[नवबौद्ध]] आहेत. आणि देशातील जवळजवळ ९०% नवयानी बौद्ध हे [[महाराष्ट्र]] राज्यात आहेत.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.indiaspendhindi.com/cover-story/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE|title=दलितों का बौद्ध धर्म अपनाना जारी, लेकिन परिवर्तन दर कम|last=मउदगिल|first=मनु|date=2017-06-23|work=IndiaSpend|access-date=2018-03-16|language=en-US}}</ref><ref>[http://www.nationaldastak.com/country-news/buddhism-has-brought-literacy-gender-equality-and-well-being-to-dalits/ Buddhism has brought literacy gender equality and well being to Dalits (in Hindi)]</ref>
* '''आमूलाग्र परिवर्तनास चालना''' :
आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतीय समाजात आमूलाग्र परिवर्तन घडून आले आणि जातिव्यवस्थेत परिवर्तन होण्यास मोठ्या प्रमाणावर सुरूवात झाली. तसेच [[विवाह]], [[धर्म]], [[अर्थशास्त्र|अर्थ]], [[शिक्षण]] [[राज्य]] या सामाजिक संस्थांतही परिवर्तन सुरू झाले. [[नवबौद्ध]]ांनी हिंदूविवाह पद्धती नाकारली व बौद्ध विवाहपद्धती स्वीकारली. बाबासाहेबांच्या पुरोगामी विचारांमुळे दलितांनी [[बलुता पद्धती]]चा त्याग केला. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला. जे लोक शिक्षणापासून वंचित होते त्यांनी शिक्षण घेणे सुरू केल्याने शिक्षणाचे सार्वत्रीकरण घडून आले. [[आरक्षण]]ाच्या धोरणामुळे [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती]]ंना राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळाली. परिणामी समाजातील सर्व घटकांना राजकीय सहभाग मिळणे शक्य झाले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४५|language=मराठी}}</ref>
* '''दलित चळवळीचा उदय''' :
आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे [[दलित चळवळ]]ीचा उदय झाला. सुरुवातीस केवळ [[महार]] लोकच या चळवळीत सहभागी झाले होते. शिक्षणप्रसाराबरोबरच इतर मागास जातीही बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या व त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू केल्या. दलित चळवळींचा विस्तार झाला. दलित चळवळीला आज प्रामुख्याने [[आंबेडकरी चळवळ]] किंवा [[आंबेडकरवादी चळवळ]] म्हटले जाते.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४५|language=मराठी}}</ref>
 
==संदर्भ==