"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४६७:
 
'इतर सर्व धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा महान संदेश देण्याऱ्या तथागत बुद्धांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यातील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या.' अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन केंद्र सरकारकडे केली होती. बुद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी ही १९४२ पासूनच मागणी होती. आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळे व दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने मात्र त्या वर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली नाही. या सर्व बाबींचा उल्लेख बाबासाहेबांनी १९५३ च्या आपल्या मुंबईतील बुद्ध जयंती कार्यक्रमाच्या भाषणात स्वतः केला आहे.<ref name="प्रणेते" />
 
== बौद्ध धर्माचा स्वीकार ==
{{मुख्य|नवबौद्ध चळवळ|नवयान|बावीस प्रतिज्ञा|बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}{{see also|नवबौद्ध|धम्मचक्र प्रवर्तन दिन|दीक्षाभूमी|दीक्षाभूमी (चंद्रपूर)}}
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar addressing his followers during 'Dhamma Deeksha' at Deekshabhoomi, Nagpur 14 October 1956.jpg|thumb|१४ ऑक्टोबर १९५६ रोजी, नागपूर येथे धम्म दीक्षा सोहळ्यामध्ये आपल्या अनुयायांना उद्देशून बोलताना आंबेडकर]]
[[चित्र:Dr. Ambedkar being administered 'Dhamma Deeksha' by Bhante Chandramani (from Kushinara) at Nagpur on 14 October 1956.jpg|thumb|कुशीनाराचे भिक्खू महास्थविर चंद्रमणी यांचेकडून दीक्षा ग्रहण करताना आंबेडकर]]
[[चित्र:Dikshabhumi.jpg|left|thumb|[[नागपूर]] येथील दीक्षाभूमीचा [[स्तूप]]]]
 
'''{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''मी बुद्धांचा धम्म (बौद्ध धर्म) सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मानणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल, तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली तीस वर्षे सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे.''| source = ''' ''- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, [[भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म]] प्रस्तावनेमधून, ६ मार्च १९५६<ref>http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/ambedkar_buddha/00_pref_unpub.html</ref>'''}}
 
आंबेडकरांनी [[हिंदू धर्म|हिंदू धर्मात]] सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण हिंदूंची मानसिकता बदलण्यास त्यांना अपयश आले. त्यामुळे हिंदू धर्मात राहून अस्पृश्यांची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा सुधारणार नाही, याची जाणीव त्यांना झाली. तसेच अस्पृश्य हे हिंदूंच्या सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही हेही त्यांना जाणवले. त्यामुळे हिंदू धर्माचा त्याग करणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले. त्यांनी असा विचार केला की, जसे स्वातंत्र्य हे भारतासाठी आवश्यक आहे, तसे धर्म बदलणे हे अस्पृश्यांसाठी आवश्यक आहे.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४६|language=मराठी}}</ref> आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती. अस्पृश्यांना हिंदू धर्मामध्ये चांगली वागणूक मिळत नाही. तसेच हिंदू धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कर्ता असून तो माणसांत भेद करतो, हिंदू धर्मात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता नाही.बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि समाजव्यवस्थेला असा प्रश्न केला, "जो धर्म अस्पृश्यांना मंदिरात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, ज्ञानार्जन करू देत नाही; आमच्या सारख्यांच्या सावलीचा विटाळ मानतो, हिंदू धर्म अस्पृश्यांना तुच्छ मानतो, अशा हिंदू धर्मात अस्पृश्यांनी का राहावे?" डॉ. बाबासाहेबांनी [[१३ ऑक्टोबर]] [[इ.स. १९३५|१९३५]] रोजी [[नाशिक]] जिल्ह्यातील [[येवले|येवला]] या गावी भरलेल्या परिषदेत [[हिंदू धर्म]]ाचा त्याग करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे हिंदूधर्मीयांना मोठा धक्का बसला. धर्मांतराच्या या घोषणेनंतर [[ख्रिश्चन]], [[मुस्लिम]], [[शिख]], [[जैन]], [[बौद्ध]], [[यहूदी]] इत्यादी धर्मांच्या धर्मगुरूंनी बाबासाहेबांनी त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसह आपल्या धर्मात यावे यासाठी निमंत्रणे दिली तर काहींनी आमिषेही दाखवली. बॅरिस्टर [[मोहम्मद अली जिना]] यांनी जयकरांमार्फत आंबेडकरांनी [[इस्लाम]] स्वीकारावा, [[पाकिस्तान]]ाला यावे व पाकिस्तानाचे गव्हर्नर व्हावे असा प्रस्ताव ठेवला होता. तर त्यावेळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत संस्थान असलेल्या [[निझाम]]ाने आंबेडकरांनी अनुयायांसह इस्लाम स्वीकारल्यास प्रत्येक व्यक्ती मागे काही कोटी रूपये देण्याचे कबूल केले होते.<ref>{{Citation|last=Zee News|title=Baba Saheb : Documentary on complete personality of Dr Bhimrao Ambedkar {{!}} Part II|date=2016-04-14|url=https://m.youtube.com/watch?t=97s&v=65fxrTaebwQ|accessdate=2018-03-30}}</ref> परंतु त्यांना भारतभूमीतला, विवेकनिष्ट व मानवी मुल्यें जपणारा धर्म हवा होता म्हणून त्यांनी ह्या दोन्ही प्रस्ताव नाकारले. ख्रिश्चन धर्माच्या विदेशी धर्मगुरूंनी त्यांना [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारण्याती विनंती केली आणि धर्म स्वीकारल्यानंतर जगातील सारेच ख्रिश्चन देश अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावण्यास मदत करतील अशी हमी दिली होती. महाबोधी सोसायटीकडून [[बौद्ध]] [[भिक्खू]]ंनी त्यांनी [[बौद्ध धर्म]] स्वीकारावा अशी तार पाठवली होती. हा धर्म [[आशिया]] खंडातील एक प्रमुख धर्म होता. जो तुमचे व तुमच्या अनुयायांचे उद्धिष्टे साध्य करेल, असे त्यात लिहिले हाते.
 
आंबेडकर बुद्धिप्रमाण्यवादी होते, त्यांनी धर्मांतराची घाई न करता सन १९३५ च्या आपल्या धर्मांतरांच्या घोषणेनंतर २१ वर्षे जगातील विविध प्रमुख धर्मांचे सखोल अध्ययन केले. त्यानंतर त्यांचा कल मानवतावादी व विज्ञानवादी धर्म म्हणून बौद्ध धम्माकडे वळला. म्हणूनच धर्मांतरापूर्वी मुंबईत १९४५ मध्ये मुंबई येथे [[सिद्धार्थ लॉ कॉलेज, मुंबई|सिद्धार्थ]] स्थापन केले.तसेच औरंगाबाद या ठिकाणी इ.स. १९५० महाविद्यालयात काढून त्यास [[मिलिंद महाविद्यालय]] व परिसरास नागसेनवन असे नाव दिले. मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाला [[राजगृह]] असे नाव दिले. त्यांनी '१४ ऑक्टोबर १९५६, नागपूर' हा धर्मांतराचे स्थळ व दिवस जाहीर केला. त्यानंतर भारतातील सर्व राज्यांतून लक्षावधी अस्पृश्य लोक नागपूर येथे धम्म दीक्षेकरिता येऊ लागले.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=१४०|language=मराठी}}</ref>
 
<span style="color: orange">
<blockquote>बाबासाहब करे पुकार
बुद्ध धम्म का करो स्वीकार...</blockquote>
 
<span style="color: blue">
<blockquote>आकाश पाताल एक करो
बुद्ध धम्म का स्वीकार करो...</blockquote>
 
अशा घोषणा देत आंबेडकरवाद्यांनी नागपूरात प्रवेश केला. नागपूर शहरात ५ लक्ष आंबेडकरानुयायी आले तेव्हा नागपूर शहराची लोकसंख्या दुप्पट झाली होती. त्या दिवशी [[विजयादशमी|अशोक विजयादशमी]] होती (या दिवशी [[सम्राट अशोक]] यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता). हे शपथग्रहण सकाळी ९.०० वाजता झाले. श्रीलंकेचे बौद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. डॉ. सविता आंबेडकर यांनी [[त्रिशरण]] व [[पंचशील]] ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्यांनंतर नवदीक्षित बौद्ध झालेल्या आंबेडकरांनी स्वतः आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि [[बावीस प्रतिज्ञा]] देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/lokprabha/babasaheb-ambedkar-and-religion-change-290869/|title=बाबासाहेब आणि धर्मातर|date=2013-12-06|work=Loksatta|access-date=2018-03-30|language=mr-IN}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-babasaheb-ambedkar-column-2481860.html|title=डॉ. आंबेडकरांचा बौद्ध धम्म|date=2011-10-06|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref> आंबेडकरांनी १५ ऑक्टोबर रोजी सुद्धा ३ लक्ष अनुयायांना दीक्षा दिली, तर [[चंद्रपूर]] येथे १६ ऑक्टोबर रोजी ३ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तसेच अकोला येथे ५०० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. तीन दिवसांतच आंबेडकरांनी १० लाखापेक्षा अधिक लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांची संख्या १० लाखांनी वाढवली.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=१५०|language=मराठी}}</ref> मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false|title=Ambedkar and Buddhism|last=Sangharakshita|date=2006|publisher=Motilal Banarsidass Publishe|isbn=9788120830233|language=en}}</ref> बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी अजब बंगला वस्तुसंग्रहालयातील बुद्धमूर्ती मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते रविशंकर शुक्ला यांच्याकडून मागिवली होती.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/babasaheb-ambedkar-had-taken-buddha-idol-from-madhya-pradesh-chief-minister-for-dhamma-daksha-125850294.html</ref> लक्षावधी अनुयायांसह बौद्ध बनून आंबेडकरांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवन केले आणि एका धार्मिक व सामाजिक क्रांतीचा पाया घातला. त्यांचे धर्मांतर जगातील एक सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होते. आंबेडकरांना 'बौद्ध धर्माचे प्रवर्तक' तसेच बौद्ध धर्माचे पुनरूज्जीवक' म्हटले जाऊ लागले. महापरिनिर्वाणापर्यंत आंबेडकरांनी ३० लक्षापेक्षा जास्त लोकांना बौद्ध धर्मात आणण्याचे कार्य केले. [[अशोक|सम्राट अशोकानंतर]] बौद्ध धर्माचे प्रसार कार्य आंबेडकरांएवढे कोणत्याही भारतीयाने केले नाही.<ref>{{Cite book|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कैलास प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४४७|language=मराठी}}</ref>
 
[[चित्र:22 Vows (in Marathi) administered by Most Revered Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Buddhist Dhamma Deeksha on 14 October 1956 at Deeksha Bhoomi, Nagpur.jpg|thumb|right|२२ प्रतिज्ञांचा दीक्षाभूमीवरील स्तंभ]]
आंबेडकरांनी बौद्धांना स्वतःच्या [[२२ प्रतिज्ञा]] वदवून घेतल्या. ह्या बौद्ध धर्माचेच सार आहेत. ज्यामध्ये बौद्ध धर्मात असलेला हिंदू देवी-देवता व संस्कृतीचा त्याग, बुद्धाचे पंचशील, त्रिशरण, अष्टांगमार्ग, दहा पारमिता, मानवी मूल्ये व तत्त्वे आहेत. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून [[पंचशील]], [[अष्टांगिक मार्ग]] व [[दहा पारमिता]] अनुसरण्याच्या आहेत. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा या आवाहन स्वरूपातील सूचनांसारखे आहेत. प्रतिज्ञा पाळण्याची ते कठोर सक्त ताकिद देत नाहीत किंवा कठोर भाषा वापरीत नाहीत. २२ प्रतिज्ञा बौद्ध धर्माचा सांस्कृतिक भाग म्हणून महत्वाच्या आहेत.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म|last=संघरक्षित|first=महास्थवीर|publisher=द कॉर्पोरेट बॉडी ऑफ द बुद्धा एज्युकेशन फाऊंडेशन|year=१९९०|isbn=|location=तैवान|pages=१४९|language=मराठी}}</ref>
 
=== आंबेडकरानंतर बौद्ध समाज ===
आंबेडकरांच्या निधनानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी [[दिल्ली]]ला नेण्यात आल्या. तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. नंतर अस्थींचे अनेक विभाजन केले गेले आणि त्यांचे भाग [[आग्रा]] सहित देशातील प्रमुख शहरात पाठवले गेले आणि प्रत्येक शहरात ठिक ठिकाणी धर्मांतराचे कार्यक्रम झाले. अशाप्रकारे नागपूर मुक्कामी घडून आलेल्या महान सामूदायिक धर्मांतरांची चळवळीची गती मुळीच कमी न होता पुढे चालू राहिली. ७ डिसेंबर १९५६ ते १० फेब्रुवारी १९५६ पर्यंतच्या अल्प काळात मुंबई, आग्रा, दिल्ली सोबतच देशातील निरनिराळ्या वीसहून अधिक शहरांत धर्मांतराचे कार्यक्रम घडून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते दीक्षा घेतलेल्या १०,००,००० बौद्धांची संख्या ४०,००,००० वर जाऊन पोहोचली.<ref name=":2" />
१९५१ च्या जनगणनेनुसार सर्व भारतात अवघे १,८०,८२३ बौद्ध होते. त्यापैकी [[महाराष्ट्र]]ात फक्त २४८७, [[पंजाब]]ात १५५०, [[उत्तर प्रदेश]]ात ३२२१, [[मध्य प्रदेश]]ात २९९१ आणि बाकीचे बहुतेक सर्व बौद्ध ईशान्य भारतातील होते. इ.स. १९५१ ते १९६१ या दशतकात महाराष्ट्रातील अधिकृत बौद्धांची संख्या २,४८७ वरून २७,८९,५०१ पर्यंत पोहोचली. तर १९५१ ते १९६१ मध्ये भारतातील अधिकृत बौद्धांची लोकसंख्या १६७१ टक्कांनी वाढून १,८०,८२४ वरून ३२,५०,२२७ पर्यंत पोहोचली होती. धर्मांतरापूर्वी महाराष्ट्रातील अनुसूचित जातीत महारांचे प्रमाण ७०% इतके होते. धर्मांतरामुळे त्यांची विभागणी ३५% बौद्ध, व ३५% हिंदू महार अशी झाली.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=१५०|language=मराठी}}</ref><ref>भारतीय जनगणना,
१९५१ व १९६१</ref><ref name=":0" /> ही केवळ सरकारी जनगणनेची आकडेवारी होती पण प्रत्यक्षात मात्र भारतातील धर्मांतरित बौद्धांची लोकसंख्या ही या जनगणनेतील बौद्ध लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटींनी अधिक होती. एका संदर्भानुसार मार्च १९५९ पर्यंत भारतातील धर्मांतरित बौद्धांची संख्या जवळ जवळ १.५ ते २ कोटी होती, जी भारतातील ४.५% लोकसंख्या होती.<ref name=":2" /><ref>[https://books.google.co.in/books?id=e-b2EzNRxQIC&printsec=frontcover&dq=ambedkar+and+buddhism&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiSiNXAuJnZAhXLro8KHR0HDhkQ6AEIJjAB#v=onepage&q=ambedkar%20and%20buddhism&f=false]</ref>
 
==संदर्भ==