"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३५८:
# दलितांना स्थानिक निवडणुका व सरकारी नोकरीसाठी जातीय कारणामुळे डावलल्या जाऊ नयेत. पात्रता असलेल्या प्रत्येक दलितास नोकरीत घ्यावे.
# सर्व प्रांतांत शैक्षणिक अनुदान देऊन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.<ref>{{Cite book|title=आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास|last=गाठाळ|first=डॉ. एस.एस.|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१९|isbn=|location=औरंगाबाद|pages=४२७ ते ४३०|language=मराठी}}</ref>
 
== शैक्षणिक कार्य ==
आंबेडकर हे उच्चविद्याविभूषित होते. तसेच ते [[शिक्षणतज्ज्ञ]] सुद्धा होते. "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." असे विचार आंबेडकरांनी मांडले.<ref>https://m.lokmat.com/jalgaon/dr-babasaheb-ambedkar-says-education-milk-wagheen/</ref><ref>https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-satyapal-maharaj-column/articleshow/61989657.cms</ref><ref>https://books.google.co.in/books?id=YoCDDwAAQBAJ&pg=PT97&lpg=PT97&dq=%E0%A4%A1%E0%A5%89.+%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%B5+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6&source=bl&ots=wafbE-SU6e&sig=ACfU3U1SwkgoasTORin6ywlDMDSdp94ZXA&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjSo722-p3nAhUAIbcAHQL1Dfo4FBDoATAIegQICRAB</ref> जातीच्या नियमानुसार कनिष्ट जातींना शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता, केवळ उच्च जातींना शिक्षणाचा अधिकार होता. त्यामुळे कनिष्ट जातींची स्थिती जवळपास गुलामासारखीच झाली होती. त्यामुळे शिक्षणामुळेच कनिष्ट जातींची स्थिती सुधारेल असा विचार करुन आंबेडकरांनी खालील कार्य केलीत.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३ व १४४|language=मराठी}}</ref><ref>https://www.forwardpress.in/2017/10/ambedkars-thoughts-on-education-an-overview-hindi/</ref>
 
=== शैक्षणिक जागृती ===
आंबेडकरांना कनिष्ठ जातींच्या शैक्षणिक मागासलेपणाची जाणीव होती. हजारो वर्षांपासून त्यांना शिक्षण नाकारलेले होते. अज्ञान व निरक्षरता यामुळेच त्यांचे उच्च जातींनी शोषण केलेले होते. जी हलक्या प्रतीची कामे उच्च जाती स्वतः करीत नव्हत्या ती कामे उच्च जाती कनिष्ठ जातींकडून सक्तीने करून घेत. आंबेडकरांनी कनिष्ठ जातींना त्यांच्या या दयनीय स्थितीचे कारण शिक्षणाचा अभाव हेच आहे याची जाणिक करून दिली. कनिष्ठ जातींच्या लोकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या मुलांना शिष्यवृत्ती, गणवेश, भोजन व निवारा अशा सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अनुयायांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" असा संदेश दिला.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४३ व १४४|language=मराठी}}</ref>
 
=== बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना ===
{{मुख्य|बहिष्कृत हितकारिणी सभा}}
कनिष्ठ जातीतील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा व त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून २० जुलै १९२४ रोजी मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी [[बहिष्कृत हितकारिणी सभा]] या संस्थेची स्थापना केली. या संघटनेच्या वतीने [[सोलापूर]] येथे [[जानेवारी ४|४ जानेवारी]], [[इ.स. १९२५]] रोजी एक वसतिगृह सुरू करून दलित, गरीब विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली. आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू. ४००००/– चे अनुदान मिळवून दिले. या संस्थेने 'सरस्वती विलास' नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू केले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=Dr. Ambedkar Life And Mission|last=Keer|first=Dhanajay|publisher=Popular Prakashan|year=1995|isbn=|locationMumbai=|pages=62}}</ref>
 
=== दलित शिक्षणसंस्थेची स्थापना ===
{{मुख्य|डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी}}
 
१४ जून १९२८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शिक्षणसंस्थेची स्थापना केली. दलितांच्या माध्यमिक शिक्षणाची सोय करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते. दलित विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कार्यासाठी [[मुंबई]] सरकारने या संस्थेस मदत करावी असे आवाहन बाबासाहेबांनी केले. कारण माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी पेलण्यास ही संस्था समर्थ नव्हती. त्यामुळे मुंबईच्या गव्हर्नरने ८ ऑक्टोबर १९२८ रोजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ५ वसतिगृहे मंजूर केली. तसेच गव्हर्नरने दरमहा रू. ९०००/– चे अनुदानही वसतिगृहांना खर्चासाठी मंजूर केले. जेव्हा ही रक्कम खर्चासाठी अपूरी पडू लागली तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[मुस्लिम]] व [[पारशी]] समुदायातील धर्मादाय संस्थांकडून व इतर काही देणगीदारांकडून आर्थिक मदत मिळवली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४|language=मराठी}}</ref>
 
=== पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ===
{{मुख्य|पीपल्स एज्युकेशन सोसायटी}}
अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]] या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.<ref>https://www.loksatta.com/lokprabha/peoples-education-society-and-dr-babasaheb-ambedkar-144407/</ref> आंबेडकरांनी या संस्थेच्यावतीने सन १९४६ मध्ये [[मुंबई]]त सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, सन १९५० मध्ये [[औरंगाबाद]] येथे [[मिलिंद महाविद्यालय]], सन १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर सन १९५६ मध्ये मुंबईत [[सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, मुंबई|सिद्धार्थ विधी महाविद्यालय]] सर्व समाजांसाठी सुरू केले.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४४|language=मराठी}}</ref> सध्या देशभरात या संस्थेची ३० पेक्षा जास्त महाविद्यालये आहेत.<ref>https://www.loksatta.com/lokprabha/peoples-education-society-and-dr-babasaheb-ambedkar-144407/</ref>
 
==संदर्भ==