"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा)यांची आवृत्ती 1743576 परतवली.
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ९३:
 
१९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना '[[बोधिसत्व]]' उपाधी प्रदान केली. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह [[बौद्ध धर्म]] स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीच त्यांचे निधन झाले. [[इ.स. १९९०]] मध्ये, त्यांना मरणोत्तर '[[भारतरत्‍न]]' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी [[आंबेडकर जयंती]] म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.<ref>[http://ccis.nic.in/WriteReadData/CircularPortal/D2/D02est/12_6_2015_JCA-2-19032015.pdf Worldwide Ambedkar Jayanti celebration from ccis.nic.in on 19th March 2015]</ref> इ.स. २०१२ मध्ये, "[[द ग्रेटेस्ट इंडियन]]" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
== सुरुवातीचे जीवन ==
==संदर्भ==
[[चित्र:Young Ambedkar.gif|thumb|right|तरुण डॉ. आंबेडकर]]
मालोजीराव हे रामजींचे वडील व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा होते. मालोजी [[ब्रिटिश भारतीय लष्कर|इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात]] [[शिपाई]] म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> मालोजीरावांना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतर मुलगीचा मिराबाई यांचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले [[रामजी सकपाळ|रामजी]] हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> शिक्षण सुरु असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय [[भीमाबाई सकपाळ|भीमाबाईंशी]] झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात [[सुभेदार]] या पदावर होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref> रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत [[कबीर]]ाचे दोहे, [[ज्ञानेश्वर]], [[नामदेव]], [[चोखामेळा|चोखोबा]], [[एकनाथ]], [[तुकाराम]] इत्यादी संतांचे [[अभंग]] पाठ केले होते. ते रोज [[ज्ञानेश्वरी]] वाचत, सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरु झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref> मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३४|language=मराठी}}</ref> रामजींना उत्तम शिक्षण बनवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात '[[सुभेदार]]' पदाचीही बढती मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३४ व ३५|language=मराठी}}</ref> रामजी व भीमाबाई या दांपत्यांना सन १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३५|language=मराठी}}</ref>