"रिडल्स इन हिंदुइझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
 
== पुस्तक प्रकाशनावरुन वाद ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या इंग्रजी ग्रंथाने १९८७-८८ च्या दरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता. या ग्रंथात रामायणाचा नायक राम आणि महाभारताचा नायक कृष्ण या दोन दैवी व्यक्तीमत्वाची कठोर तर्कशुद्ध चिकित्सा करण्यात आली होती. या ग्रंथावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेना व अन्य संघटनांनी केली होती. त्यानंतर या ग्रंथाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक मोर्चे-प्रतिमोर्चे, आंदोलने-प्रतिआंदोलने झाली होती. सामाजिक तणावही निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र  सर्व रिपब्लिकन नेते, बाळासाहेब ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री शंकराव चव्हाण यांनी एकत्रित बसून "या ग्रंथात व्यक्त झालेल्या मताशी सरकार सहमत असेलच असे नाही", अशी तळटीप टाकण्याच्या तडजोडीवर हा वाद मिटवला. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]] मध्ये रिडल्स इन हिंदुइझम हा चौथा खंड आहे.<ref>https://www.loksatta.com/mumbai-news/riddles-in-hinduism-in-marathi-1057448/</ref>