"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २१५:
=== कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट ===
[[File:Dr. Babasaheb Ambedkar and his followers at Vijaystambha of Bhima Koregaon (Pune, Maharashtra).jpg|thumb|300px|right|]]
१ जानेवारी १८२७ रोजी [[कोरेगाव भिमा|भीमा कोरेगाव]] येथील विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी [[महार रेजिमेंट|महार बटालियनच्या]] शौर्याचे कौतुक आंबेडकरांनी केले. बाबासाहेबांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे [[कोरेगावची लढाई|ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई]] झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे [[महार]] सैनिक लढले होते. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून [[पेशवे|पेशव्यांच्या]] ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले. अस्पृश्य जातीतील ज्या महार सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या हक्कासाठी या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक भव्य ऐतिहासिक असा विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभीमानाचे प्रतीक बनवले. २५ डिसेंबर १९२७ रोजी [[महाड]] येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणतात की, "''तूम्ही शूर विरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भिमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात''."<ref>https://www.bbc.com/hindi/india-42542280</ref><ref>https://www.bbc.com/hindi/amp/india-42598739</ref><ref> https://m.lokmat.com/pune/dr-babasaheb-ambedkar-gave-salute-vijaystambha-bhima-koregoan/amp/</ref><ref>https://www.bbc.com/marathi/amp/india-42554568</ref>
 
=== महाडचा मुक्तिसंग्राम ===