"पंढरी जुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
त्यानंतर ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘चार दिन चार राहे’ या सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने पंढरीदादांना रशियाला जायला मिळाले आणि शूटिंग आटपल्यावर वर्षभर राहून दादांनी तिथे मेकअपचे रीतसर शिक्षण घेतले. तिथून परतल्यावर भारतीय सिनेमाच्या मायासृष्टीत ते रमले. आयुष्याच्या अखेरपर्यंतच्या काळात एकतरी मेकअप केल्याशिवाय त्यांचा दिवस सरत नव्हता. रशियातून आल्यावर दादा अनेक वर्षे [[बी.आर. चोप्रा]] यांच्यासोबत होते. परंतु, यश चोप्रांनी, चोप्रा ग्रुपला अलविदा केल्यावर दादाही त्यांच्याबरोबर बाहेर पडले आणि ‘दाग’पासून ‘यशराज फिल्म्स’बरोबर त्यांचे जे स्नेहबंध जुळले ते कायमचे.
 
राजकमल कलामंदिर, यशराज फिल्म्स, बालाजी टेलिफिल्म्स यांसारख्या अनेक चित्रपट निर्मिती संस्थांसाठी त्यांनी काम केले. अमिताभ बच्चन, अशोककुमार, आमीर खान, करीना कपूर, काजोल, जुही चावला, दिलीपकुमार, देव आनंद, नूतन, मधुबाला, माधुरी दीक्षित, मीनाकुमारी, राज कपूर, राजेश खन्ना, विद्या बालन, शाहरूख खान, श्रीदेवी, सुनील दत्त, यांसारख्या अनेक अभिनेत्यांचे सौंदर्य खुलवण्यात पंढरी जुकार यांचा मोलाचा वाटा होता. 'काला पत्थर', 'चित्रलेखा', 'झनक झनक पायल बाजे', 'ताजमहाल','दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'नागिन','नील कमल','नूरजहाँ','मिस्टर इंडिया', 'शोले', यां सारख्या किमान ७२५०० चित्रपटांसाठी त्यांनी मेकअप आर्टिस्टचे काम केले.
 
==पंढरीदादा जुकर यांना मिळालेले पुरस्कार==