"नीलिमा बोरवणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नीलिमा बोरवणकर या एक मराठी लेखिका व कथाकथनकार आहेत. रशियन भाषेच्...
(काही फरक नाही)

२२:०४, १५ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

नीलिमा बोरवणकर या एक मराठी लेखिका व कथाकथनकार आहेत. रशियन भाषेच्या डिप्लोमाचा अभ्यास करताना त्यांच्या वाचनात एका दहा वर्षाच्या रशियन मुलाची रोजनिशी आली. ती वाचल्यावर नीलिमाताईंच्या मनात मराठीत कथालेखन करायची ऊर्मी दाटून आली. विज्ञानाच्या पदवीधर असूनही नीलिमा बोरवणकरांनी मराठी साहित्य निर्मितीत कमालीचे यश मिळवले. त्यांच्या बऱ्याचशा कथा आधी कथाश्री, पद्मगंधा, मैत्रीण विपुलश्री आदी दिवाळी अंकांतून प्रकाशित झाल्या होत्या.

श्रीशशी ठाणेदार फाऊंडेशनने ठेवलेल्या 'ठाणेदार शिष्यवृत्ती'तून नीलिमा बोरवणकर यांचे 'आम्ही मायदेशी मुलं परदेशी' हे पुस्तक सिद्ध झाले.

नीलिमा बोरवणकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • आम्ही मायदेशी मुलं परदेशी (अभ्यासग्रंथ)
  • कानडीनं पकडली चोरी (बालसाहित्य)
  • गाज (कादंबरी)
  • झळाळ (व्यक्तिकथासंग्रह)
  • दूरचे डोंगर (कथासंग्रह)
  • निजखूण (कादंबरी)
  • भवताल (कथासंग्रह)
  • रंगभान (कथासंग्रह)
  • रंगभूषाकार आणि माणूस विक्रम गायकवाड (व्यक्तिचित्रण)