"रघुनाथ महारुद्र भुसारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रघुनाथ महारुद्र भुसारी (जन्म : पाथरी-परभणी जिल्हा, ४ सप्टेंबर १९०...
(काही फरक नाही)

१८:३७, २५ जानेवारी २०२० ची आवृत्ती

रघुनाथ महारुद्र भुसारी (जन्म : पाथरी-परभणी जिल्हा, ४ सप्टेंबर १९०४) हे प्राचीन महाराष्ट्राच्या धार्मिक व सांस्कृतिक इतिहासाचे लेखक, तसेच प्राचीन मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक होते.

पाथरीतून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांनी परभणीच्या शाळेतून माध्यमिक शिक्षण घेतले आणि पुढे औरंगाबाद विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपकेंद्रातून ते बी.ए. झाले. बी. ए. झाल्यावर भुसारी पुराणवास्तू संशोधन शास्त्राच्या अभ्यासासाठी ते कलकत्ता विद्यापीठात दाखल झाले. परत आल्यावर त्यांनी निजाम सरकारकडून शिष्यवृत्ती घेतली आणि ते नागपूर विद्यापीठातून एम.ए. झाले. नंतर त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले. हैदराबादलाच ते एका काॅलेजचे प्राचार्य झाले.

नोकरीचा व्याप सांभाळून भुसारीनी पुष्कळ साहित्य सेवा केली.

आद्यकवी वसंत मुकुंदराज हे अंबेजोगाईचे नसून अंभोर - खेडला या परिसरातले आहेत, हे भुसारीचे संशोधन गाजले.

रघुनाथ महारुद्र भुसारी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आद्य महाराष्ट आणि सातवाहनकाळ
  • कवी एलहनकृत 'अष्टविनायकाविवाह' आणि 'वसंतवर्णन' ह्या महानुभावीय ग्रंथाचे संपादन
  • नागराजकृत 'प्रतिष्ठान वर्णन' या ग्रंथाचे संपादन
  • प्राचीन महाराष्ट्राचा धार्मिक इतिहास
  • मराठवाडयातील यादवकालीन शिलालेखांचे वाचन आणि संपादन. या विषयावरील त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले.


{{DEFAULTSORT:भुसारी,रघुनाथ महारुद्र]] वर्: इ.स. १९०४ मधील जन्म