"रावजीशास्त्री सदाशिवशास्त्री गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रावजीशास्त्री सदाशिवशास्त्री गोडबोले (जन्म : इ.स. १८३४; मृत्यू : ८...
(काही फरक नाही)

१५:२७, २३ जानेवारी २०२० ची आवृत्ती

रावजीशास्त्री सदाशिवशास्त्री गोडबोले (जन्म : इ.स. १८३४; मृत्यू : ८ सप्टेंबर १९०१) हे याकरणकार, भाषांतरकार, इंग्रजी पुस्तकांचे अनुवादक व आद्य मराठी समीक्षक होते.

पुण्यातील जुन्या विश्रामबागेतील पाठशाळेत संस्कृत व इंग्रजी भाषांचे अध्ययन केल्यावर रावजीशास्त्रींनी काही काळ इंग्रजी साहेबांना मराठी शिकवण्याचे काम केले. इंगजी राजवटीत मराठी भाषाभिज्ञ म्हणून त्यांचा नाव लौकिक होऊन अनेक वर्ष ते दक्षिणा प्राईज कमिटीचे कार्यवाह होते. त्यानंतर शाळा खात्यात ट्रान्सलेटर म्हणून काही काळ काम केल्यावर त्यांनी शालेय पुस्तके तपासून घेणे. नवी पुस्तके काढणे, छापणे आदी कामे केली. या कामाचाच एक भाग म्हणजे परभाषेतील पुस्तके अनुवादित करणे. यातूनच त्यांच्या हातून साहित्य सेवा झाली, ती अशी :

रावजीशास्त्री गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके

  • जेम्स वाईल्डच्या Hereward सीरीजमधील पुस्तकांचे मराठी भाषांतर
  • महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास (शालेय पाठ्यपुस्तक)
  • रावजीशास्त्री सदाशिवशास्त्री गोडबोले यांचे मराठी भाषेचे मध्यम व्याकरण
  • रॉबिन्सन क्रुसो याचे चरित्र (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - डॅनियल डीफो) + टीकाकार - जे. पाॅल हंटर
  • हिंदुस्थानातील लोकांचा संक्षिप्त इतिहास (शालेय पाठ्यपुस्तक)

विशेष

एक कुशाग्र बुद्धीचे पुस्तक तपासनीस असे रावजीशास्त्रींचे नाव झाले होते. त्या काळातील शाळाखात्यातील पुस्तके त्यांच्याच नजरेखालून जात असत. त्यांवरील त्यांचे अभिप्राय फारच मार्मिक असत. मराठी ग्रंथविषयक टीकेचा उदय त्यांच्या लेखणीतून झाला, असे सांगितले जाते.