"वि.गो. आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डाॅ. विष्णू गोपाळ आपटे (जन्म : १८ सप्टेंबर १८५१; मृत्यू : २९ जुलै १८९...
(काही फरक नाही)

१४:४१, २३ जानेवारी २०२० ची आवृत्ती

डाॅ. विष्णू गोपाळ आपटे (जन्म : १८ सप्टेंबर १८५१; मृत्यू : २९ जुलै १८९९) हे अव्वल इंग्रजी कालखंडात वैद्यकीय सारख्या किचकट विषयावर लिखाण करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणारे लेखक होते.

कोल्हापुरातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर कोल्हापूर संस्थानाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या जोरावर मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातून एल.एम.ॲन्ड एस. (शिक्षणसंस्थांची आणि अभ्यासक्रमांची संक्षिप्‍त नावे असणारी यादी|लायसेन्शिएट इन मेडिसिन ॲन्ड सर्जरी]]ची पदवी पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन संपादन केली. यानंतर काही काळ सरकारी डॉक्टर आणि नंतर कोल्हापूरच्या दरबाराचे असिस्टंट सर्जन म्हणून त्यांनी काम केले.

वैद्यकीय विषयावर लिखाणाची आवड असणाऱ्या आपट्यांची कोल्हापूरच्या ग्रंथमालेतून 'न्यायवैद्यक' आणि 'प्रसूतिचिकित्सक' ही दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. पाश्चात्य वैद्यकाप्रमाणे आर्यवैद्यकशास्त्राचाही त्यांचा अभ्यास होता. या अभ्यासातूनच त्यांचा 'ग्रामवैद्य अथवा खेड्यातील प्रजा निरोगी राहण्याचा उपाय ' हा ग्रंथ तयार झाला. याशिवाय, त्यांनी इंग्रज सरकारने तयार केलेल्या 'डोमेस्टिक एकॉनॉमी' या ग्रंथाच्या मराठी भाषांतरासाठी प्रा. बालाजी प्रभाकर मोडक यांना बरेच साहाय्य केले.

लोकसेवापरायण आणि वृत्तीने अध्यात्मिक असणाऱ्या विष्णू गोपाळ आपटयांच्या मुंबई पुण्याच्या साहित्यविषयक चळवळीत पुढाकार व सहभाग असे.

वयाच्या अवघ्य ४८व्या वर्षी या साहित्यिक डाॅक्टरचे निधन झाले.

वि.गो. आपटे यांनी लिहिलेली पुस्तके

  • ग्रामवैद्य अथवा खेड्यातील प्रजा निरोगी राहण्याचा उपाय
  • डोमेस्टिक एकॉनॉमी (अनुवादित; मूळ लेखक - मायकेल डोनोव्हन; सहअनुवादक - प्रा. बालाजी प्रभाकर मोडक)
  • न्यायवैद्यक
  • प्रसूतिचिकित्सक