"फ्रेडरिक नित्शे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विसाव्या शतकाच्या बौद्धिक वातावरणावर नित्शे (जन्म :इ.स. १८४४; मृत...
(काही फरक नाही)

१३:१०, २३ जानेवारी २०२० ची आवृत्ती

विसाव्या शतकाच्या बौद्धिक वातावरणावर नित्शे (जन्म :इ.स. १८४४; मृत्यू : इ.स. १९००) इतका प्रभाव अन्य तत्त्ववेत्त्यांचा नाही. नित्शेचे हे ऋण जगभरातील सर्वच लेखकांनी मान्य केले आहे. नित्शेच्या विचारांचा प्रभाव अनेक साहित्यिक, कलावंत, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते यांच्यावर पडला. पुढे त्यांनी आपल्या विचारांनी जग बदलून टाकले. या प्रतिभावंत विचारवंतांत वॅग्नर, शौपेनहोर, डार्विन, ग्रीक, आल्बेर काम्यू, सार्त्र यांप्रमाणेच अनेक महान व्यक्तींचा उल्लेख करता येईल.

नित्शे ‘परमेश्वराचा अंत झाला ' म्हणतो, या गोष्टीशी जोडल्या गेलेल्या अनेक सामाजिक आणि मानसिक प्रश्नांची चर्चा या पुस्तकात आहे. देव आणि धर्म यासंबंधीचे त्याचे तत्त्वज्ञान आणि यानिमित्ताने त्याची भूमिका समजून घेता येते. नित्शेचे तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व विचार या पुस्तकात आहेत. अर्थात हे सर्व जाणून घेण्यासाठी त्याचे चरित्रही येथे दिल्यामुळे अभ्यासकांची मोठी सोय झाली आहे.

नित्शे हा मूलगामी आणि तात्त्विक प्रश्न उपस्थित करणारा तत्त्ववेत्ता आहे. नित्शेला अस्तित्वादी परंपरेचा आद्यप्रवर्तक समजले जाते. नित्शेने जगाला सतावणाऱ्या प्रश्नांची केवळ चर्चा केली नाही तर त्यावर उपायही शोधले.


फ्रेडरिक नित्शेविषयी मराठीतली पुस्तके==

  • फ्रेडरिख नित्शे :- जीवन आणि तत्वज्ञान ([[विश्वास पाटील )