"सखाराम गंगाधर मालशे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
डॉ. '''स.गं. मालशे''' (जन्म : २४ सप्टेंबर १९२१; मृत्यू : ७ जून १९९२) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, समीक्षक व संपादक होते.
 
एम.ए. झाल्यावर मालशे मराठीचे प्राध्यापक झाले. 'फादर स्टीफन्सकृत ख्रिस्त पुराण’ भाषिक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएच,डी केली. मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका आदी नियतकालिकांचे ते संपादक होते.
 
आपल्या लेखन कारकिर्दीच्या सुरुवातीला स.गं. मालशे यांनी 'व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथा ', हसा आणि लठ्ठ व्हा’ ही संपादने केली. त्यांच्या लघुकथा, कादंबरी, विनोदी आदी लेखांचा संग्रहही ' ‘आवडनिवड’ या नावाने प्रसिद्ध झाला. नीरक्षीर हा नाट्यविषयक लेखांचा संग्रहही त्यांचा प्रकाशित झाला. या संग्रहातून पाश्चात्य नाटयकृती व दिग्दर्शकासंबंधीचे लेख आहेत. या लेखमालेतून त्यांची विश्लेषक बुद्धी, सडेतोड मांडणी आणि मार्मिक विचार यांचे दर्शन घडते. कालांतराने मालशे ऐतिहासिक दृष्टीने विचार करणारे संहिताभ्यासक, संपादक व समीक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले. 'केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित', 'सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता', 'लोकहितवादीकृत जातिभेद', 'दोन पुनर्विवाह प्रकरणे', स्त्री - पुरुष तुलना अशा अनेक संहितात्मक पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केल्या.
 
मालशे यांनी [[धनंजय कीर]] यांच्या सहकार्याने जोतिबा फुलेकृत 'शेतकऱ्यांचा आसूड', 'महात्मा फुले समग्र वाङमय', 'झेंडूची फुले' हे सर्व ग्रंथ संपादन करून पुनःप्रकाशात आणले.
 
मालश्यांचे आणखी एक मोलाचे कार्य म्हणजे ऑस्टिन वाॅरेन आणी रेने' वॆलेक यांनी लिहिलेल्या 'थिअरी ऑफ लिटरेचर' या पुस्तकाचा साहित्य सिद्धान्त असा अनुवाद केला. या ग्रंथातून साहित्यसमीक्षा, साहित्य संशोधन, साहित्योतिहास, साहित्यभासाच्या पद्धती यासंबंधी चर्चा केली आहे.
 
याशिवाय मालशे यांनी युजीन ओ'नीलच्या 'स्ट्रेंज इंटरल्यूड' या नाटकाचा अनुवाद 'सुख पाहता' असा केला. मालश्यांच्या साहित्यांतून त्यांची विश्लेषक बुद्धी, सडेतोड मांडणी आणि मार्मिक विचार यांचे दर्शन घडते.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line ५१ ⟶ ६१:
|-
| ऋणानुबंधाच्या गाठी ||व्यक्तिचित्रे || ||
|-
| केशवसुतांच्या कवितांचे हस्तलिखित ||संपादित || ||
|-
| [[गडकरी]] ||संपादन || ||
Line ५९ ⟶ ७१:
|-
| तारतम्य || || परचुरे प्रकाशन ||
|-
| दोन पुनर्विवाह प्रकरणे ||पुस्तिका || ||
|-
| नाटकाची स्थित्यंतरे ||कृ.आ. गुरुजी यांनी लिहिलेल्या लेखांचे संपादन || ||
Line ७३ ⟶ ८७:
|-
| लाडवा ||कादंबरी || ||
|-
| लोकहितवादीकृत जातिभेद ||पुस्तिका || ||
|-
| विधवा विवाहाची चळवळ १८००-१९०० || वैचारिक || || सहलेखिका : नंदा आपटे
|-
| विलक्षण तंटे ||बालसाहित्य || ||
|-
| व्यंकटेश माडगुळकर यांच्या कथा ||संपादित || ||
|-
| शोधनिबंधांची लेखनपद्धती ||माहितीपर || ||
|-
| [[सयाजीराव गायकवाड]] ||चरित्र|| ||सहलेखक : व्ही.के. चावडा
|-
| सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता ||संपादित || ||
|-
| साहित्य सिद्धान्त ||वैचारिक || || अनुवादित, मूळ इंग्रजी Theory of Literature
|-
| सुख पाहता ||नाटक || अनुवादित, मूळ इंग्रजी युजीन ओ'नीलचे 'स्ट्रेंज इंटरल्यूड'
|-
| स्त्री-पुरुष तुलना ||समीक्षा || ||
|-
|}