"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५९७:
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून देशाच्या प्रत्येक भाषेत आंबेडकरवादी निर्माण झाले आहेत. आंबेडकरांवर दरवर्षी अनेक संशोधक आणि साहित्यिक नवनवीन ग्रंथ लिहित असतात. विदेशातदेखील आंबेडकरी साहित्याची विशेष चर्चा असून, आंबेडकरी साहित्याचा अनुवाद इंग्रजीत मोठ्या प्रमाणात होत आहे. आंबेडकरांच्या ग्रंथांचा, प्रतिमांचा आणि आंबेडकरी साहित्यांचा प्रचंड खप होतो. [[दीक्षाभूमी]] आणि [[चैत्यभूमी]]वर दरवर्षी कोट्यवधी रूपयांची पुस्तके विकली जातात. शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेल्या समाजात आंबेडकरांमुळे ज्ञानर्जनाची वृत्ती निर्माण झाली. आंबेडकरांच्या जीवनावर चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिल्याचे दिसून येते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95755/8/07_chapter%203.pdf|शीर्षक=|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=१२३}}</ref>
 
आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या तत्त्वज्ञानामुळे देशातील शोषित समाज जागृत होत आहे.<ref name=":1" /> बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरूज्जीवन केले. ही घटना भारतातील बौद्ध धम्माचे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. इतर देशात विशेषतः बौद्ध राष्ट्रांत आंबेडकरांचे ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले जात आहेत. [[महाराष्ट्र]] शासनाने प्रकाशित केलेल्या [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे]] या २४ खंडाच्या ग्रंथांना जगभरातून मोठी मागणी आहे. [[तैवान]] देशातील एक बौद्ध संस्था आंबेडकरांच्या धार्मिक ग्रंथांच्या जगातील विविध भाषेत लाखो प्रती प्रकाशित करून त्यांना मोफत वाटत असते.<ref>http://www.budaedu.org/ebooks/6-EN.php</ref><ref>http://www.budaedu.org/en/</ref>
 
''भीमायन : एक्सपीरियन्सेस ऑफ अनटचेबिलिटी'' (भीमायन : अस्पृश्यतेचे अनुभव) हे आंबेडकरांचे ग्राफिक चरित्र आहे, ज्याला परधन-गोंड कलाकार, दुर्गाबाई व्याम, सुभाष व्याम, आणि लेखक श्रीविज्ञान नटराजन आणि एस. आनंद यांनी बनवले आहे. या पुस्तकात आंबेडकरांच्या लहानपणापासून ते प्रौढत्वापर्यंतच्या अस्पृश्यतेच्या अनुभवांना दर्शवण्यात आले आहे. सीएनएनने त्यास शीर्ष ५ प्रसिद्ध कॉमिक पुस्तकांपैकी एक म्हटले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://edition.cnn.com/2011/WORLD/europe/05/19/graphic.novels/index.html |title=The top five political comic books |last1=Calvi |first1=Nuala |date=23 May 2011 |publisher=CNN |accessdate=14 April 2013 |deadurl=no |archiveurl=https://web.archive.org/web/20130109004845/http://edition.cnn.com/2011/WORLD/europe/05/19/graphic.novels/index.html |archivedate=9 January 2013 |df=dmy-all}}</ref>