"सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर (जन्म : २६ नोव्हेंबर १८८०) हे लेखक, बालसा...
(काही फरक नाही)

२०:४७, १८ जानेवारी २०२० ची आवृत्ती

सत्यबोध बाळकृष्ण हुदळीकर (जन्म : २६ नोव्हेंबर १८८०) हे लेखक, बालसाहित्यिक, जर्मन साहित्याचे अनुवादक आणि शिक्षणतज्ज्ञ होते.

हुदळीकरांचे प्राथमिक शिक्षण सांगलीत तर, माध्यमिक जमखंडीत व पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून झाले. मुंबई विद्यापीठातून भूस्तरशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी एम.एची पदवी संपादन केली. पुढे याच विषयात जर्मनीतून पीएच.डी. केली.

हुदळीकरांचे जर्मन भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांनी जर्मन साहित्यातील अनेक पुस्तकांचे अनुवाद केले.

'जर्मन भाषाप्रवेश' व 'जर्मन फॉर इंडियन स्टूडेंट्स' ही त्यांची भाषाविषयक दोन पुस्तके आहेत.

त्यांची अन्य पुस्तके - पश्चिम आघाडीवर सामसूम, तरुण वेटरची दुःखे, फऊल हायसच्या स्फुट गोष्टी, दादांचे लग्न, वगैरे. जर्मन कवी गटेची सुभाषितेदेखील त्यांनी मराठीत आणली.

बालशिक्षण या विषयाची हुदळीकरांना विशेष जाण होती. मुलांसाठी त्यांनी बालकमंदिर ही संस्था सुरू केली. बालविकास मासिकात त्यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह 'मुलांनी अभ्यास कसा करावा ' या नावाने प्रसिद्ध झाला. याशिवाय, हुदळिकरांनी मुलांसाठी रंजक अशा बोधपर कथा लिहिल्या. 'मेवाडचा राजपुत्र प्रतापसिंह' ही त्यांनी मुलांसाठी लिहिलेली कादंबरी अतिशय लोकप्रिय ठरली.