"पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ७७:
* सखाराम बापू
* हरिपंत फडके

==पेशवाई थाट==
'पेशवाई थाट' हा महाराष्ट्रात अगदी सहज वापरला जाणारा वाक्प्रयोग आहे. मध्यंतरी 'पेशवाई थाट' म्हणून पेशवाईतील जेवणावळींचे वर्णन करणारा एक कागद प्रसिद्ध आहे. त्या कागदात कामाची एक यादी आहे. सदर यादी 'काव्येतिहास-संग्रहात प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक पत्रे, यादी वगैरे लेख' (संपादक गो.स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकसकर) अशी प्रसिद्ध झाली आहे. १० फेब्रुवारी १७८३ च्या नाना फडणवीस यांनी बनवून दिलेल्या नेमणूक यादीत सुमारे बावीस बंद आहेत. सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नातील जबाबदाऱ्या व नेमणुका नाना फडणवीस यांनी करून दिल्या आहेत.

यादीतील काही उल्लेख दिले, म्हणजे 'पेशव्यांचा थाट' आणि नाना फडणवीसांची काटेकोर व्यवस्था आणि शिस्त याचे काही मासलेवाईक नमुने नजरेस येतील. उदा०
#.जेवण झाल्यावर हात धुवायला कोमट पाणी, हातावर साखर व दात कोरावयास लवंग देत जावे.
#. गंध-अक्षत लावताना - वाकडे गंध लागू नयें व अक्षता लावताना नाकाला धक्का न लागता कपाळचा मध्य पाहून लहान मोठी अक्षत ओघळ न येता वाटोळी लावावी व गंध उभे-आडवे ज्यास पाहिजे तसे लावावे.
#गंध अक्षत लावणार याणी नखे काढून बोटे चांगली करून लावावे'
#. गंध राहिल ते जपोन दूसरे दिवसास राखीत जावे.
#. विडे ज्यास जसे देणे तसे यथायोग्य पाहून देत जाणे. वावगा खर्च करू नये.
#. भोजनासाठी बनवायची पक्वान्ने व जिन्नस याची तर एक व्यवस्थित यादीच दिली आहे. अगदी विडा बनवण्यासाठीचे साहित्य व पूर्ण पद्धत यात दिलेली आहे.
#. चांगल्या कोशिंबिरी वीस प्रकारच्या व तिखट चटण्या चांगल्या बारीक वाटून रुचिकर कराव्यात. निंबू चिरून पंचामृत, रायती व भरते दोन आदिकरून पंचवीस तीस प्रकार करावे. एक दुसरी चमत्कारीक कोशिंबीर करावी.
'विचारून वाढावी.' !!

==विडे बांधायचे काम नि|| केशवराव बल्लाळ केतकर==
खाशीं पानें कमावीसदारांकडून आणवली आहेत, ती माफजतीने राखावीं. वरकड पानांची तरतूद जाहली न जाहली पाहत जावी व खरेदी करावीं.

सुपारी फुवर्डा वगैरे चांगली पाहून धुवावी. त्यांपैकी तबकांत मोकळी घालावयाची त्यास केशराचे पाणी देऊन, गुलाब घालून, रंगदार करावी; व काही रोठा सुपारीचे फूल पाडून ठेवावे. चिकणी सुपारी नुस्ती व खुषबोईदार करून ठेवीत जावी.

पाने कळीची गंगेरी व रामटेकी तबकांत घालावी. ती रुमालाने पुसून चांगली निवडून नीट करून ठेवून देत जावी. व काही पाने सोनेरी वर्ख लावून तयार करावी.

विडे बांधणे ते हिरवे खर्ची पानांचा व बाजूचा सात पानांचा बांधावा. पिकल्या पट्या बाजूच्या सात पानांच्या सुपारीचे पानांची गुंडी उभी घालूनभरदार चांगल्या बांधाव्या. कुलपी विडे केळीची पाने लावून दहा पानांचा एक व बारा पानांचा एक. त्यांत गंगेरी दोन पाने घालीत जावी. त्यास दुकाडीची खूण करावी. या प्रमाणे कुलपी विडे धुतली सुपारी घालून चुना नेमस्त दुसरे पानास न लागे असा घालून बांंधावे.

ज्या दिवशी ब्राह्मण भोजनास व बायकांकडील जसे विडे लागतील तशी तरतूद करीत जावी. चुना केशरी व साधा पांढरा सफेत खांसा सभेंत तबकांत ठेवण्याकरिता करावा.

साहित्यास कारकून वगैरे :-

१ कारकून

१ ढलाईत

१ प्यादे

१ शिंदे पोरगे व खिजमतगार

१ भोई

१ कामाठी

==साहित्य==
# सुपारी, कात, आंबाडी तसलमातीस आणावी. कालचा खर्च आज समजावून चिठ्ठी घेत जावी.
# चुना पारनेर व रेवदंडा व धोडपे पैकीं.
# कुंभार काम व बुरूड काम.
# नगारे यांचे पूड व घागरी व खाद्या व अडकित्ते व सुऱ्या, कातऱ्या वगैरे.
# चुना, सुपारी व रंगण्यास केशर व गुलाब.

(अपूर्ण)

==पेशव्यांच्या इतिहासावरील ललितेतर पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/पेशवे" पासून हुडकले