"बी.सी. कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: बापू चंद्रसेन कांबळे (जन्म: १५ जुलै १९१९) हे एक भारतीय लेखक, संपादक...
 
No edit summary
ओळ १:
बापू चंद्रसेन कांबळे (जन्म: १५ जुलै १९१९) हे एक भारतीय लेखक, संपादक, वक्ता, राजकारणी, व घटनातज्ज्ञ आहेत. ते आंबेडकरवादी विचारवंत, अनुवादक व चरित्रकारही आहेत. भारतीय रिपब्लिकन पक्ष (कांबळे) या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी "समग्र आंबेडकर चरित्र" (खंड १-२४) नावाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी जीवनचरित्र लिहिले आहे.
 
विधिज्ञ असलेल्या काबळेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचा मसुदा तयार करताना मदत केली होती. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे ५० वर्षे कांबळे यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व केले. बाबासाहेबांच्या निधनानंतर रिपब्लिकन पार्टीत फूट पडली. त्यातील एका गटाचे (कांबळे गट) ते अध्यक्ष होते. त्या दोन पक्षांना, गटांना अनुक्रमे दुरूस्त व नादुरूस्त असे नावेही पडली होती, त्यातील नादुरूस्त गटाचे प्रतिनिधीत्व हे बापू कांबळे करायचे.