"अनुवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन संदर्भ घातले, मृत दुवा काढला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३८:
 
===भाषांतर===
साधारणपणे जिथे मूळ अर्थात फारसा फरक पडणार नाही, अशा गोष्टी भाषांतरात येऊ शकतात. जसे सरकारची वा संस्थेची नियमावली, वस्तूंच्या याद्या, अकाउंट्समधील आकडे /हिशोब /गणिते / पद्धती / नमुने / विज्ञानशाखेतील समीकरणे, अर्थशास्त्रातील नियम - सिद्धांतसिद्धान्त वगैरे गोष्टींचा अनुवाद नाही, तर भाषांतर होऊ शकते.
 
साधारणपणे जिथे मूळ अर्थात फारसा फरक पडणार नाही, अशा गोष्टी भाषांतरात येऊ शकतात. जसे सरकारची वा संस्थेची नियमावली, वस्तूंच्या याद्या, अकाउंट्समधील आकडे /हिशोब /गणिते / पद्धती / नमुने / विज्ञानशाखेतील समीकरणे, अर्थशास्त्रातील नियम - सिद्धांत वगैरे गोष्टींचा अनुवाद नाही, तर भाषांतर होऊ शकते.
 
 
Line ४५ ⟶ ४४:
 
==संधी==
 
{{बदल}}
वर उल्लेख केल्याप्रमाणे, अनुवाद हा ललित साहित्यकृतींचा (जसे - पुस्तके, कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक, विवेचन, ललित लेख, गाणी, चरित्र, टीका-टिपण्या, शैक्षणिक माहिती, अग्रलेख आणि तत्सम सर्व गोष्टी ज्या साहित्य प्रकारात येतात त्यांचा) होऊ शकतो.
Line ५३ ⟶ ५१:
 
===सरकारी तसेच विविध खाजगी क्षेत्रांतील आवश्यकता आणि उपलब्धता ===
 
[[भारत]] हा बहुभाषिक देश असल्यामुळे इथे प्रांतिक तसेच जागतिक भाषेतही अनुवाद होत असतात. अनुवादाला पर्यायाने अनुवादकांना तसेच भाषांतरकार ह्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रापुरते]] बोलायचे झाले तर सरकारने या अनुवाद कार्यासाठी स्वतंत्र [[भाषा संचालनालय]]<ref>भाषा संचालनालय , महाराष्ट्र राज्य - अधिकृत संकेतस्थळ https://bhasha.maharashtra.gov.in/Default.aspx</ref> निर्माण केले आहे. [[भाषा सल्लागार मंडळ|भाषा सल्लागार मंडळाची]] स्थापना केली.<ref>भाषा सल्लागार समिती https://bhasha.maharashtra.gov.in/Upload/Bhashasallagarsamiti.pdf</ref> त्यांच्या अथक प्रयत्नांमधून प्रशासनिक मराठी भाषेचा विकास झालेला आहे हे सर्वज्ञात आहे. आज सरकारच्या सर्व व्यवहारात, विधान मंडळाच्या कामकाजात सर्वत्र [[मराठी|मराठीचा]] वापर होतो. त्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्त्व असणाऱ्या आणि मराठी भाषेचा पदव्युत्तर अभ्यास केलेल्या मुलामुलींना [[भाषा संचालनालय]], विधान मंडळ इत्यादी ठिकाणी भाषांतरकार आणि अनुवादक म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. <ref>भाषा संचालनालय - संपर्क - https://bhasha.maharashtra.gov.in/ContactUs.aspx</ref>
 
कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असू शकते - <ref>भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई - https://bhasha.maharashtra.gov.in/AboutUs.aspx#4</ref>
 
* अर्थसंकल्पीय तसेच प्रशासनिक व नियम पुस्तिकांचा अनुवाद करणे
* विधिविषयक अनुवाद व परिभाषा तयार करणे
Line ६३ ⟶ ५९:
 
=== न्यायव्यवहार ===
 
सरकारी व्यवहाराप्रमाणे न्यायव्यवहारातही राजभाषा मराठीचा वापर अनिवार्य झाल्यामुळे न्यायव्यवहार क्षेत्रांमध्ये, न्यायालयांमध्ये भाषांतरकार आणि अनुवादकांची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झालेली आहे. इथे केवळ मराठीमध्ये भाषांतर / अनुवाद करणाऱ्यांचीच नाही तर मराठीतून किंवा अन्य [[भारतीय भाषा|भारतीय भाषांमधून]] इंग्रजीमध्ये भाषांतर / अनुवाद करणाऱ्या करणाऱ्यांचीही गरज आहे. तसेच [[नोकरी]] न करता स्वतंत्रपणे हे काम करूनही अर्थार्जन करता येईल.
 
=== प्रसारमाध्यमे ===
 
[[वृत्तपत्र|वृत्तपत्रे]], [[नियतकालिक|नियतकालिके]], [[रेडियो]], [[दूरदर्शन]] यांसारख्या प्रसारमाध्यमांमध्येही अनुवादकांची सातत्याने निकड भासत असते. [[जाहिरात|जाहिरातक्षेत्रही]] झपाट्याने विकसित होत असल्याने या क्षेत्रात अनुवादकांची सातत्याने गरज वाढते आहे. याव्यतिरिक्त [[विज्ञान]], [[तंत्रज्ञान]], वैद्यक इत्यादींसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्षेत्रांमध्येही अनुवादकांची गरज असते. इंग्रजीमधून सातत्याने प्रस्तृत होणारे अद्ययावत ज्ञान मराठी भाषेमध्ये किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषेमध्ये आणणे हे अतिशय अवघड काम आहे. अभ्यासू अनुवादकांची या क्षेत्रात खूप गरज आहे.
 
=== परिभाषा ===
 
वैज्ञानिक आणि तांत्रिक विषयांचे लेखन, [[कायदा|कायद्याचे]] लेखन हे [[परिभाषा]]निष्ठ लेखन असते. त्यामुळे अशा प्रकारच्या लेखनाचा अनुवाद करण्यासाठी अनुवादकाकडे त्या त्या विषयाच्या परिभाषेचे ज्ञान असावे लागते तसेच वेळप्रसंगी गरज पडल्यास पारिभाषिक शब्द तयार करण्याची क्षमता असायला हवी. कारण अशा प्रकारच्या लेखनात परिभाषेचा अचूक वापर करावा लागतो, विचार नि:संदिग्धपणे मांडावे लागतात. वाक्ये सुटसुटीत लिहून अनावश्यक क्लिष्टता, बोजडपणा टाळावा लागतो. प्रशिक्षणाने आणि नंतर अनुवादकाच्या व्यक्तिगत अभ्यासाने, सरावाने हे जमू लागते.
 
 
==अनुवाद - एक कलाविष्कार==
 
थोडक्यात म्हणजे [[अनुवाद]] ही कला आहे, तसेच त्याचे शास्त्र आणि तंत्रही आहे. सृजनशीलता आणि अभ्यास यांच्या योगाने या क्षेत्रात यश मिळवता येते. सुयोग्य [[प्रशिक्षण]] कार्यक्रम तयार करून अनुवादकांना प्रशिक्षण दिल्यास अनुवाद प्रशिक्षक म्हणूनही यशस्वी व्यवसाय करणं शक्य आहे.
 
दळणवळणाच्या साधनांनी जसे जगातले अंतर दिवसेंदिवस कमीकमी होते आहे, तसेच अनुवाद आणि भाषांतरामुळे जग जवळ येते आहे. आज अनुवादाचे महत्त्व सगळ्यांना पटले आहे. त्यामुळे या क्षेत्रात अर्थार्जनाच्या आणि स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करण्याच्या संधी निर्माण होत आहेत. त्यांचा सुजाणपणे विचार करायला हवा.
 
==पुस्तके==
* अनुवाद : अवधारणा और आयाम (हिंदी लेखसंग्रह, संपादक : सुरेश तायडे, विजय लोहार)
* Emjoying Liturature (मराठी भाषांतरावरील इंग्रजी पुस्तक,लेखिका : प्रा. सहस्रबुद्धे-देशपांडे)
* भाषांतर (सदा कऱ्हाडे)
* भाषांतर आणि भाषा (विलास सारंग)
* भाषांतर चिकित्सा (डॉ. मधुकर मोकाशी)
* भाषांतर शास्त्र की कला? (म.वि. फाटक, रजनी ठकार)
* भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौंदर्य (वा.के. लेले)
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुवाद" पासून हुडकले