"सतीश गुप्ते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सतीश मधुकर गुप्ते (जन्म : वसई, ४ ऑगस्ट १९४७) हे एक मराठी लेखक व समा...
(काही फरक नाही)

२२:१९, २८ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

सतीश मधुकर गुप्ते (जन्म : वसई, ४ ऑगस्ट १९४७) हे एक मराठी लेखक व समाजकार्यकर्ते आहेत. ते पश्चिम बोरीवलीत राहतात.

शिक्षण व नोकरी

  • सतीश गुप्ते ह्यांनी बी.काॅम. झाल्यावर ॲडव्हान्ड अकाऊंटसीचा डिप्लोमा केला, आणि ते रसेल हेक्ट फार्मा (Russel Hecht Pharma) या कंपनीत नोकरीला लागले. तेथे सेल्स ॲडमिन मॅनेजर झाल्यावर काही वर्षांनी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांची घरची शेती आहे. पूर्वी एक व्यवसायही होता. निवृत्तीनंतर सतीश गुप्ते यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांच्या ७५हून अधिक लघुकथा मराठी दिवाळी अंकांतून व अन्य नियतकालिकांतून प्रकाशित झाल्या आहेत. त्यांचे दोन कथासंग्रह बोरीवलीच्या' नवचैतन्य प्रकाशन'ने प्रसिद्ध केले आहेत.

सतीश गुप्ते यांचा बोरीवलीची कायस्थ प्रभु सभा, कोकण विकास परिषद, विकलांग पुनर्वसन केंद्र, शिवजयंती उत्सव समिती, दहिसरचा शिवाजी स्पोर्ट्‌स क्लब, बोरीवलीची शुक्रतारा संस्था आदी सांस्कृतिक संस्थांच्या कामकाजात सहभाग असतो.

सतीश गुप्ते यांचे कथासंग्रह आणि प्रवासवर्णनावरील पुस्तके

  1. कधीतरी कुठेतरी (कथासंग्रह)
  2. कुठे ना कुठे (कथासंग्रह)
  3. माझी प्रवासगंगा : इ.स. २००६ ते २०१८ या कालावधीत केलेल्या ३० देशांपैकी १२ देशांच्या सहलींचा लेखाजोखा.

पुरस्कार

  • नाशिक सार्वजनिक वाचनालयाचा २०१४ सालचा 'लक्षणीय साहित्यकृती' पुरस्कार
  • ठाण्याच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु संस्थेकडून उल्लेखनीय साहित्यिकाचा पुरस्कार