"दिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८७:
* तमिळनाडूतीत मद्रासी लोक : प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.
* महाराष्ट्रातील मराठी समाज : लक्ष्मी पूजन सोडले तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे ही यांची दिवाळी. ती रमा एकादशीपासून (आश्विन कृष्ण एकादशीपासून) सुरू होते. त्या रात्री फक्त तुळशीपुढे तेल-वात घालून उजळवलेली पणती ठेवतात. दुसरा दिवस वसू बारस. या दिवसापासून रोज भरपूर पणत्या लावून विजेच्या दिव्यांची रोषणाई करतात. घराबाहेर रांगोळी काढतात. आकाशकंदील लावतात. घरात गवारीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत असतो. तिसरा दिवस धन त्रयोदशी. ज्या बायकांनी आधीपासूनच दिवाळीचा फराळ, म्हणजे लाडू, करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेव-चकली-चिवडा करायला सुरुवात केली नसेल तर ती करून काम लवकरात लवकर संपवतात. ज्या घरात फार माणसे असतील त्या घरातील स्त्रिया या दिवशी 'बायकांची न्हाणी' उरकून घेतात. चौथा दिवस - नरक चतुर्दशी. अगदी पहाटे उठून आधल्या दिवशी स्वच्छ केलेल्या संडासात पणती ठेवतात. पहाटेच घराबाहेर पणत्या ठेवतात आणि रोषणाई करतात. घरातील लोकांचे, विशेषत: पुरुषांचे, सूर्योदयापूर्वीच तेल उटणे लावून अभ्यंगस्नान होते. लोक आंघोळ करत असताना फुलबाज्या लावतात आणि फटाके फोडतात. नंतर सर्वजण फोडणीचे किंवा दडपे पोहे खातात. दिवाळीचा फराळ खाणे येता जाता चालूच असते. शेजारा-पाजाऱ्यांना फराळाची ताटे पाठवतात. त्यांच्याकडूनही ताटे येतात. ज्यांच्या घरात काही अशुभ घडल्याने दिवाळी नसते त्यांना आवर्जून फराळाचे जिन्नस आणि मुलांसाठी फटाके पाठवतात. पुढचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची साग्रसंगीत पूजा होते. ही पूजा घरातला कर्ता पुरुष करतो. लक्ष्मीच्या मूर्तीशेजारी, काही दागिने आणि बंदे रुपये ठेवतात. त्यांचीही पूजा होते. प्रसादासाठी लाह्या-बत्तासे-डाळिंबाचे दाणे एकत्र करून एका तबकात ठेवलेले असतात. घरात या दिवसासाठी मुद्दाम केलेले अनरसेही ठेवतात. पूजेनंतर प्रसाद वाटतात व खातात. पुढचा दिवस दिवाळीच्या पाडव्याचा. जेवणाचा बेत श्रीखंडपुरी, उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी. या दिवशी स्त्रिया नवरा, दीर, सासरे आदींना ओवाळतात. नंतरचा दिवस भाऊबीजेचा. यासाठी भाऊ बहिणींच्या घरी जाऊन फराळ करतात किंवा जेवतात आणि ओवाळून घेतात. घराबाहेर पणत्या लावायचा आणि फटाके उडवण्याचा हा दिवाळीतला शेवटचा दिवस. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एकदा छोट्या प्रमाणात रोषणाई करून घरातले उरलेसुरले फटाके फोडून संपवतात. दिवाळीत बनवलेले व न संपलेले फराळाचे जिन्नस पुढच्या दिवसांत खाऊन संपवतात.
 
दिवाळी अंक : महारा़्ष्ट्राचे वाङ्मयीन भूषण म्हणजे मराठी दिवाळी अंक. दरवर्षी सुमारे ८०० दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. मराठी माणसे किमान एक दिवाळी अंक विकत घेतात आणि इतर अनेक अंक लोकांकडून किंवा वाचनालयातून आणतात व वाचतात.
 
दिवाळीच्या दिवसांत मुले किल्ले करतात. आकाशदिवा बनवतात. किल्ल्यांची तिकीट लावून प्रदर्शने भरतात. रांगोळीची प्रदर्शनेही असतात. शहरातील अजून शिल्लक असलेल्या हौदांच्या पाण्यावर काही कलावंत तरंगती रांगोळी काढतात. लोक हौसेने या रांगोळया पाहण्यासाठी रांगा लावून तिकिटे काढतात.
* केरळमधील मल्याळी समाज : दिवाळीच्या दिवशी अय्यप्पा देवाची पूजा करतात. घरांभोवती आणि मंदिरांत रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्ने बनवून लोकांना केळीच्या पानांमधून प्रसाद वाटतात.
* पंजाबातील शीख समाज : शीखांच्या ६व्या गुरूंना [[जहांगीर]] बादशहाने कैद करून ठेवले, त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली. म्हणून शीख तो दिवस 'दाता बंदी छोड दिवस' म्हणून साजरा करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/दिवाळी" पासून हुडकले