"दिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८६:
* बौद्ध समाज : गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.
* तमिळनाडूतीत मद्रासी लोक : प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.
* महाराष्ट्रातील मराठी समाज : यांची दिवाळी रमा एकादशीपासून (आश्विन कृष्ण एकादशीपासून) सुरू होते. त्या रात्री फक्त तुळशीपुढे तेल-वात घालून उजळवलेली पणती ठेवतात. दुसरा दिवस वसू बारस. या दिवसापासून रोज भरपूर पणत्या लावून विजेच्या दिव्यांची रोषणाई करतात. घराबाहेर आकाशकंदील लावतात. घरात गवारीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत असतो. तिसरा दिवस धन त्रयोदशी. ज्या बायकांनी आधीपासूनच दिवाळीचा फराळ, म्हणजे लाडू, करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेव-चकली-चिवडा करायला सुरुवात केली नसेल तर ती करून काम लवकरात लवकर संपवतात. ज्या घरात फार माणसे असतील त्या घरातील स्त्रिया या दिवशी 'बायकांची न्हाणी' उरकून घेतात. चौथा दिवस - नरक चतुर्दशी. अगदी पहाटे उठून आधल्या दिवशी स्वच्छ केलेल्या संडासात पणती ठेवतात. पहाटेच घराबाहेर पणत्या ठेवतात आणि रोषणाई करतात. घरातील लोकांचे, विशेषत: पुरुषांचे, सूर्योदयापूर्वीच तेल उटणे लावून अभ्यंगस्नान होते. लोक आंघोळ करत असताना फुलबाज्या लावतात आणि फटाके फोडतात. नंतर सर्वजण फोडणीचे किंवा दडपे पोहे खातात. दिवाळीचा फराळ खाणे येता जाता चालूच असते. शेजारा-पाजाऱ्यांना फराळाची ताटे पाठवतात. ज्यांच्या घरात काही अशुभ घडल्याने दिवाळी नसते त्यांना आवर्जून फराळाचे जिन्नस आणि मुलांसाठी फटाके पाठवतात. पुढचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी संध्याकाळी लक्षमीची साग्रसंगीत पूजा होते. ही पूजा घरातला कर्ता पुरुष करतो. लक्ष्मीच्या मूर्तीशेजारी, काही दागिने आणि बंदे रुपये ठेवतात. त्यांचीही पूजा होते. प्रसादासाठी लाह्या-बत्तासे-डाळिंबाचे दाणे एकत्र करून एका तबकात ठेवलेले असतात. घरात या दिवसासाठी मुद्दाम केलेले अनरसेही ठेवतात. पूजेनंतर प्रसाद वाटतात व खातात. पुढचा दिवस दिवाळीच्या पाडव्याचा. या दिवशी स्त्रिया नवरा, दीर, सासरे आदींना ओवाळतात. नंतरचा दिवस भाऊ बीजेचा. यासाठी भाऊ बहिणींच्या घरी जाऊन फराळ करतात किंवा जेवतात आणि ओवाळून घेतात. घराबाहेर पणत्या लावायचा आणि फटाके उडवण्याचा हा दिवाळीतला शेवटचा दिवस. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एकदा छोट्या प्रमाणात रोषणाई करून घरातले उरलेसुरले फटाके फोडून संपवतात. दिवाळीत बनवलेले व न संपलेले फराळाचे जिन्नस पुढच्या दिवसांत खाऊन संपवतात.
* केरळमधील मल्याळी समाज : दिवाळीच्या दिवशी अय्यप्पा देवाची पूजा करतात. घरांभोवती आणि मंदिरांत रांगोळी काढून दिवे लावतात. दक्षिण भारतीय मिष्टान्ने बनवून लोकांना केळीच्या पानांमधून प्रसाद वाटतात.
* पंजाबातील शीख समाज : शीखांच्या ६व्या गुरूंना [[जहांगीर]] बादशहाने कैद करून ठेवले, त्यांची आश्विन अमावास्येला सुटका झाली. म्हणून शीख तो दिवस 'दाता बंदी छोड दिवस' म्हणून साजरा करतात.
* सिंधी समाज : पूर्वी सिंधू नदीच्या काठी दिवे लावायची सिंधी परंपरा होती. आता घरात गणेशाची आणि लक्षमीची पूजा करून घराच्या दरवाज्यांत दिवे लावतात.
 
==स्थानिक उत्सव /सांस्कृतिक कार्यक्रम==
दिवाळीच्या सणासाठी स्थानिक पातळीवर विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. उदा. वसुबारस या दिवशी सवत्स धेनूच्या पूजेचे आयोजन चौकाचौकांत केले जाते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/pune-news/vasubaras-festival-celebrate-1158487/|शीर्षक=गोपूजनाने झगमगत्या दीपोत्सवाचा प्रारंभ|last=ठोंबरे|first=दया|date=८. ११. २०१५|work=|access-date=२३. १०. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> दिवाळीच्या फटाक्यांची आतषबाजी मोकळ्या मैदानात योजली जाते. फराळ वाटप, कला अभिव्यक्ती असे कार्यक्रमही योजले जातात.दिवाळीचे औचित्य साधून विविध शहरांमध्ये दिवाळी पहाट, पाडवा पहाट यासारखे [[संगीत]], [[नृत्य]], वादन अशा विविध कलांचा आस्वाद घेण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.esakal.com/pune/sakal-diwali-pahat-event-sakal-225512|शीर्षक=https://www.esakal.com/pune/sakal-diwali-pahat-event-sakal-225512|last=|first=|date=१८. १०. २०१९|work=|access-date=२३. १०. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/diwali-pahat-program-1328537/|शीर्षक=‘दिवाळी पहाट’चे बदलते सूर|last=|first=|date=३०. १०. २०१६|work=|access-date=२३. १०. २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref> तसेच काही ठिकाणी वसुबारस, नरकचतुर्दशी अशा निमित्ताने सामूहिक दीपोत्सव कार्यक्रम केले जातात, ज्यामध्ये नागरीकही सहभागी होतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/दिवाळी" पासून हुडकले