"कादर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
कादर खान हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि त्यांत अभिनय करणारे नट होते.
 
कादर खान यांच्या जन्माआधी त्यांच्या आईला ३ मुलगे झाले होते, पण ते लहानपणीच वारले. त्यामुळे आईला वाटे की कादरचेही तसे काही होऊ नये. कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या आईला तलाक मिळाला. म्हणून त्यांनी कादरला घेऊन मुंबईला यायचे ठरवले. मुंबईत ते धारावी झोपडपट्टीत राहात. डोंगरीला जाऊन ते एका मशिदीसमोर भीक मागत. दिवसभरात दोन रुपये मिळाले की ते आईला आणून देत. थोडे मोठे झाल्यावर 'मला कुठल्यातरी कामाला जाऊ दे' असे ते आईला सांगत. पण आईने त्यांना शिक्षण घ्यायला लावले व बाकीच्या सर्व अडचणी स्वत: झेलल्या.
 
आईने नमाजासाठी मशिदीत पाठवले की ते नमाजाला दांडी मारून कबरस्तानात जात व दोन कबरींच्यामध्ये बसून स्वत:शीच संवाद करीत फिल्मी डायलाॅग्ज बोलत. एकदा असे करताना त्यांना अशरफ खान यांनी पाहिले. त्यांच्या नाटकात काम करण्यासाठी त्यांना एका आठ वर्षाच्या मुलाची जरूर होती. अशरफ खान यांनी कादरला आपल्या नाटकात काम दिले.
{{विस्तार}}
 
कादर एकदा शाळेच्या वर्गात बसले असताना शाळेच्या मुख्याध्यापकांना [[दिलीपकुमार]] यांचा फोन आला आणि त्यांनी कादरखानांचे नाटक पहायची इच्छा व्यक्त केली. एवढ्याशा कादरने त्यांना दोन अटी घातल्या, पहिली [[दिलीपकुमार]] यांनी नाटक सुरू व्हायच्या आधी वीस मिनिटे नाठ्यगृहात हजर रहावे, आणि दुसरी नाटक संपेपर्यंत थिएटर सोडून जाऊ नये. [[दिलीपकुमार]]ांनी अटी मान्य केल्या, नाटक पाहिले आणि कादरखान यांना दोन चित्रपटांसाठी साईन करवून घेतले. अशा रीतीने कादरखान यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली.
 
 
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:खान, कादर}}
"https://mr.wikipedia.org/wiki/कादर_खान" पासून हुडकले