"समतेचा पुतळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३४:
 
==पार्श्वभूमी आणि इतिहास ==
मुंबईतील दादर चौपाटीवर असलेली [[चैत्यभूमी]] ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधीस्थळ असून आंबेडकरांच्या अनुयायांसाठी महत्त्वाची जागा आहे. चैत्यभूमी समोर असलेल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाचे काम सध्या सुरु आहे. चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी जमणाऱ्या लाखोंच्या जनसमुदायासाठी जागा उपलब्ध व्हावी, ही मागणी [[सुशीलकुमार शिंदे]] मुख्यमंत्री असताना २००३ मध्ये पुढे आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना वंदन करायला चैत्यभूमीवर दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक येतात. दोन-तीन दिवस मुंबईत येणारा हा जनसमुदाय [[शिवाजी पार्क]], [[दादर|दादर चौपाटी]] आणि चैत्यभूमी या परिसरात उघड्यावर राहतो. या लोकांना किमान निवारा मिळावा, हा विचार १९८६मध्येही पुढे आला होता. त्या वेळी [[राजा ढाले]], [[नामदेव ढसाळ]] आणि [[ज.वि. पवार]] यांनी समुद्रात भराव टाकून चैत्यभूमीचा विस्तार करण्याची मागणी केली होती. मात्र पर्यावरणासंदर्भातील प्रश्नांमुळे ही मागणी मागे पडली. २००३मध्ये हा विचार पुन्हा पुढे आला आणि तो एक राजकीय मुद्दा बनला. सन २००३च्या डिसेंबर महिन्यात ही मागणी व्हायला लागली आणि २००४मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आल्या. या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जाहीरनाम्यात पहिल्यांदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा उल्लेख करण्यात झाला. तेव्हा हे स्मारक कुठे व्हावे, याची चर्चा सुरू झाली तेव्हा इंदू मिलचे नाव पुढे आले. "काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात इंदू मिलचा विषय आला खरा, पण २००४ ते २००९ पर्यंत त्याबाबत फारशी काहीच प्रगती झाली नाही. २००९मध्येही पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्तानेच इंदू मिलचा विषय ऐरणीवर आला होता. पण त्यानंतरही काहीच प्रक्रिया झाली नाही," असा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष [[आनंदराज आंबेडकर]] करतात. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०११मध्ये आझाद मैदानात एक सभा झाली आणि त्या सभेत त्यांनी [[महाराष्ट्र सरकार]]ला इशारा दिला होता की, "इंदू मिल प्रकरणी ६ डिसेंबर २०११ पर्यंत निर्णय घेतला नाही, तर [[महापरिनिर्वाण दिन]]ी हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करून ताबा घेतला जाईल." ठरल्याप्रमाणे आंदोलन झाले आणि २६ दिवस रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये शिरून ठिय्या दिला होता. "पोलीस बंदोबस्त चोख होता. पण आमचीही तयारी झाली होती. इंदू मिलवर आमचा झेंडा रोवण्यासाठी आम्ही गनिमी कावा वापरायचे ठरवले होते," असे रिपब्लिकन सेनेचे तत्कालीन महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ निकाळजे सांगतात. त्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या दरम्यान इंदू मिलची जागा मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू झाला. "२०१२मध्ये आमच्या पक्षानेही या प्रश्नी आंदोलन केले. आमच्या आंदोलनाची दखल घेऊन मग ५ डिसेंबर २०१२ रोजी [[आनंद शर्मा]] यांनी लोकसभेत इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देत असल्याचे जाहीर केले," असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री [[रामदास आठवले]] सांगतात. इंदू मिलच्या जागी बाबासाहेबांचे स्मारक करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर ६ डिसेंबर २०१२ रोजी चैत्यभूमीवर आनंद साजरा करण्यात आला.