"कमर जलालाबादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: हिंदी-उर्दू कवी कमर जलालाबादी (जन्म : जलालाबाद-पंजाब, २९ फेब्रुवा...
(काही फरक नाही)

१७:४६, १८ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

हिंदी-उर्दू कवी कमर जलालाबादी (जन्म : जलालाबाद-पंजाब, २९ फेब्रुवारी १९१६; मृत्यू : ९ जानेवारी, २००३) हे हिंदी चित्रपटांसाठी गीते करणारे गीतकार होते. अमृतरपासून पासून १७६ किलोमीटर दूर असलेल्या जलालाबाद नावाच्या छोट्या गावात त्यांचा जन्म झाला. जन्मनाव ओम प्रकाश. वडलांचे लाला हरजस राय. हे भंडारी खत्री पंजाबी होते, गावातले प्रभावशाली व्यक्ती होते. इंग्रजी राजवटीत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. जलालाबाद काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते.

ओम प्रकाश याला अभ्यासात फारसा रस नव्हता. तरी त्याने कसेबसे करून उर्दू शाळेत दहा इयत्ता पास केल्या. वयाच्या सातव्या वर्षी त्यांना शायरीमध्ये रस निर्माण झाला, आणि काही वर्षांत त्यांचे लेखनही सुरू झाले. गावातीलच एका 'अमर' नावाचा एका माणसाला ओम प्रकाशच्या ह्या लिखाणाचे कौतुक वाटे. त्यांनी या मुलाला प्रोत्साहन देऊन पुढचा मार्ग दाखवला. ओम प्रकाशची शायरी वाचून 'अमर' ह्यांनी तो मोठा कवी होईल असे भाकित केले आणि त्याला स्वत:साठी चांगले टोपणनाव निवडायला सांगितले. ओम प्रकाशने 'अमर'शी मिळते जुळते क़मर हे नाव घेऊन त्याला जलालाबादी हे गावाचे नाव जोडले, आणि ओम प्रकाश भंडारीचा 'क़मर जलालाबादी' झाला. नवीन नाव घेतले आणि त्यांनी उठताबसता, बिछान्यावर पडल्यापडल्या शायरी लिहायला सुरुवात केली. उर्दूमध्ये क़मर म्हणजे चंद्र. त्यांचा पहिला कवितासंग्रह 'रश्क़े-क़मर' या नावाने प्रकाशित झाला. (त्यानंतर अनेक वर्षांनी एका कवीने 'रश्क़े-क़मर' हे नाव घेऊन कविता लिहिल्या!) (उर्दूत रश्क म्हणजे ईर्षा, हेवा).

सन १९३५मध्ये क़मर जलालाबादी यांनी रोज़नामा प्रताप नावाच्या उर्दू वर्तमानपत्रात नोकरी सुरू केली. तेथून निघाल्यावर 'मिलाप' नावाच्या वर्तमानपत्रात लागले. काही वर्षातच ते 'निराला' नावाच्या मासिकाचे संपादक झाले. पुढल्या काळात ते हिंदी चित्रपटात कथा-संवाद-गीते लिहायला सुरुवात केली. पण इतके असले तरी त्यांना देवनागरीचा 'द'ही येत नव्हता.

याच कार्यकालात क़मर जलालाबादी 'स्टार शाहकार' नावाच्या पत्रिकेचे संपादक झाले.


(अपूर्ण)