"खेळ विषयावरील चित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
 
राणी मुखर्जी ही 'हइशा' चित्रपटात पुरुषी कपडे घालून क्रिकेट खेळतॆे, कारण तिच्या गावात मुलींना क्रिकेट खेळायची बंदी असते.
 
आमिरखानच्या लगान (Lagaan) या क्रिकेट ही मध्यवर्ती थीम असलेल्या चित्रपटात शेतीवर लादलेला लगान (कर) माफ करवून घेण्यासाठी, अडाणी गावकरी राज्यकर्त्या ब्रिटिशांच्या टीमशी क्रिकेट खेळतात आणि जिंकतात.
 
'साँड की आँख' चित्रपटात [[तापसी पन्नू]] आणि [[भूमी पेडणेकर]] या नेमबाज दाखवल्या आहेत.
 
[[बॅडमिंटन]], [[टेबल टेनिस]] आणि [[टेनिस]]मध्ये शून्य स्कोअर दाखवण्यासाठी 'लव्ह' शब्द वापरतात. हा अंडे अशा अर्थाच्या l'oeuf या फ्रेंच शब्दाचा अपभ्रंश असावा. कॅरममध्येही एकाच खेळाडूने सर्व सोंगट्या कॅरमच्या खिशांत घातल्या तरीही त्याला मराठीत 'लव्ह गेम' दिला म्हणतात. पण या संदर्भात वापरला जाणारा 'लव्ह गेम' हा अधिकृत शब्द नसावा. [[इंदूर]]मधील विभावरी संस्थेच्या सदस्यांनी बॅडमिंटनवर आधारित एक हिंदी कथा-चित्रपट काढला आहे, त्याचे नाव 'लव्ह ऑल' ठेवले आहे. समग्र भारतातून आलेल्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या या चित्रपटाचे शूटिंग भोपाळमध्ये झाले आहे, केके मेनन कोचच्या भूमिकेत आहेत, गीतलेखन सोनल शर्मांचे असून संगीत दिग्दर्शन सौरभचे आहे. [[सोनू निगम]]ने गीते गायली आहेत. बॅडमिंटनवर बेतलेला हा बहुधा पहिलाच हिंदी चित्रपट असावा.
 
==जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी==
सामान्यत: भारताची टीम परदेशात, विशेषत: पाकिस्तानात खेळायला जाते तेव्हा देशाचे पंतप्रधान खेळाडूंना जिंकून या असा आशीर्वाद देतात. [[जवाहरलाल नेहरू]] म्हणाले होते की पाकिस्तानात गेल्यावर खेळाडू वृत्तीने खेळा, तर [[अटलबिहारी वाजपेयी]] म्हणाले होते की 'दिल जीत के आओ'.