"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Filled in 6 bare reference(s) with reFill 2
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११:
 
== राजकीय कारकीर्द ==
सुजात आंबेडकर हे राजकीय कार्ये करत असले तरी सक्रियपणे राजकारणात आलेले नाहीत. "लोकांची मागणी असेल तर राजकारणात येईल. पण तोवर लोकांना मदत करण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी मी कायम लोकांसोबत आणि चळवळीसोबत असेन," असं त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणतेही पद नाही. निवडणुकीच्या कार्यकाळात पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सोशल मीडिया सांभाळणे, आंबेडकरी मुस्लीम, आणि अन्य बहुजन तरुणांना एकत्र बांधून ठेवणे, या जबाबदाऱ्या सुजात यांच्याकडे असतात. सुजात यांच्या आई डॉ. अंजली आंबेडकर यादेखील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराची कार्ये करीत असतात.<ref>https://www.bbc.com/marathi/india-47797013</ref>
 
२७ मे २०१८ रोजी आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेशी खुला संवाद साधला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात उतरली. एल्गार मार्चमध्ये सुजात यांचे दोन मिनिटांचे भाषण होते. पण, ते चमकदार अन् प्रभावी ठरले. त्यांनी शुद्ध भाषेत आणि नम्रतेने भाषण केले. सुजात म्हणाले, "वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. ‘या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे’," असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्याच्या आवाहनाला उपस्थितांनी दादही दिली.<ref name="auto2"/>