"अजिंक्य पोंक्षे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अजिंक्य पोंक्षे हा एक मराठी गायक अभिनेता आहे. डॉ. कविता गाडगीळ, प्...
(काही फरक नाही)

१७:३६, २१ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

अजिंक्य पोंक्षे हा एक मराठी गायक अभिनेता आहे. डॉ. कविता गाडगीळ, प्रसाद गुळवणी यांच्याकडून त्याने शास्त्रीय संगीताकरिता मार्गदर्शन घेतले आहे. त्याचे अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम झाले आहेत.

अजिंक्य पोंक्षे याने रत्नागिरीतील ‘खल्वायन’ या संस्थेच्या संशयकल्लोळ नाटकाद्वारे संगीत रंगभूमीवर पदार्पण केले. त्या नाटकातील गीत गायनासाठी त्याला रौप्यपदक मिळाले. त्यानंतर प्रीतिसंगम, सौभद्र या नाटकांमधून प्रमुख गायक नट म्हणून त्याने राज्य नाट्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.