"श्रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
 
श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते.
 
राखी पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चंपावत जिह्यातल्या देईपुरी इलाख्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या दोन गटांत एकमेकांवर दगडफेक होते. दगडफेकीत अनेकजण घायाळ होतात. २०१९ साली १२० लोक जखमी झाले होते. मात्र हायकोर्टाने दगडफेकीवर बंदी आणल्याने काही लोकांनी दगडांऐवजी सफरचंदे फेकून मारली.
 
* श्रावण वद्य प्रतिपदा (मध्य प्रदेशातील भाद्रपद वद्य प्रतिपदा) : भुज(जा)रिया पर्व. राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भुजरिया पर्व असते. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खेड्यांमध्ये हे धूमधडाक्यात साजरे होते. भुजरिया पर्वाची तयारी नागपंचमीपासून होते. या दिवशी घरांघरांत टोपल्यांमध्ये किंवा मातीच्या छोट्या कुंड्यांमध्ये माती भरून घरातले गव्हाचे बी पेरतात. अंकुर फुटल्यावर ती रोपे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपटून नदीच्या पाण्यात बुचकळून धुतात आणि एकमेकांना वाटतात. रोपांना कजलिया म्हणतात. गावातील वृद्ध माणसे कजलिया पाहून एक प्रकारे मातीचे आणि बियांचे परीक्षण करतात, व रोपे आणणाऱ्या मुलांना खाऊ देतात.
 
या निमित्ताने गावातले स्त्री-पुरुष टिमकी, ढोलक, झांजा, यांच्या तालावर नाचतात. स्त्रिया मंगलगीते गात गात नदीवर, जलाशयांवर जाऊन भुजारियांचे विसर्जन करतात.
 
* श्रावण वद्य [[अष्टमी]]- [[श्रीकृष्ण]] जयंती/'''[[कृष्ण जन्माष्टमी|कृष्ण जन्माष्टमी']]''
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रावण" पासून हुडकले