"भालचंद्र कोल्हटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भालचंद्र कोल्हटकर (जन्म : इ.स. १९३६; मृत्यू : २० मार्च २०१९) हे डोंबि...
(काही फरक नाही)

२२:१९, ३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

भालचंद्र कोल्हटकर (जन्म : इ.स. १९३६; मृत्यू : २० मार्च २०१९) हे डोंबिवलीत राहणारे एक नाट्यकर्मी होते. [[डोंबिवली शहरात नाट्यचळवळ रुजावी यासाठी त्यांनी खूप धडपड केली. शालेय वयापासूनच ते रंगमंचावर छोटीमोठी कामे करीत. तरुण वयात ते डोंबिवलीतील गुरुदत्त मित्र मंडळ या युवा रंगकर्मींच्या संस्थेत दाखल झाले. खासगी कार्यालयात नोकरी करत असल्याने त्यांना व्यावसायिक नाटकांत कामे करता आली नाहीत, म्हणून त्यांनी त्यांचा अभिनय प्रायोगिक रंगभूमीपर्यंतच सीमित ठेवला. नोकरीतून निवृत्त झाल्यावर मात्र त्यांनी स्वत:ला नाट्य चळवळीत पूर्णपणे झोकून दिले.

भालचंद्र कोल्हटकर हे डोंबिवली शहरातील अनेक संस्थांचे मार्गदर्शक व सल्लागार होते. शहरात होणाऱ्या नाट्यविषयक व साहित्यविषयक कार्यक्रमांना त्यांची हमखास हजेरी असे.

भालचंद्र कोल्हटकर हे हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते श्रीराम कोल्हटकर (निधन : ३ ऑगस्ट २०१९) यांचे वडील होत.

भालचंद्र कोल्हटकरांची भूमिका असलेली प्रायॊजिक नाटके

  • अर्ध्याच्या शोधात दोन
  • सहलीला सावली आली