"कारगिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६२:
==कारगीलचे पर्यटन==
कारगीलला पर्यटन स्थळाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. जेथे पाकिस्तानने बाँंब फोडले होते तेथे आज एक कारगिल हाईट्स नावाचे हाॅटेल आहे. हाॅटेलात एक जुना बंकर ग्राहकांच्या विलोकनार्थ शाबूत ठेवला आहे. (असे बंकर पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीनंतर लडाखच्या प्रत्येक घरात बनले होते.) लोकांनी मागणी केल्यावरून 'लडाख हिल डेव्हलपमेन्ट काऊन्सिल' अस्तित्वात आले. त्यामुळे आता कारगीलमध्ये ४०हून अधिक हाॅटेले झाली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या घरांतही राहण्याची सोय होते. कारगीलला सन २०१६ या वर्षात ४२ हजार, २०१७मध्ये ६७ हजार तर २०१८ या एकाच वर्षात एक लाख सात हजार पर्यटकांनी भेट दिली.
 
==कारगील युद्धाच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त==
२६ जुलै २०१९ या दिवशी कारगील युद्धाला वीस वर्षे झाली. त्याच्या एक दिवस आधी जम्मू ॲन्ड कश्मिर रायफल्सच्या १३व्या बटालियनची एक बाईक रॅली उत्तराखंडातील दर्रापासून सुमारे १८५० किलोमीटरचा प्रवास करून २१ दिवसांनी लडाखमधील द्रासला पोचली. शेफ संजीव कपूर यांनी सैनिकांसाठी खास तिरंगी खीर बनवली होती. सर्व सैनिकांनी व अधिकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र भोजन केले. जवानांच्या हौतात्म्यावर भारतीय सेनेने ८.२४ मिनिटांची एक शाॅर्ट फिल्म जारी केली. त्याअगोदर कारगिल ट्रिबूट गीत गायले गेले व वाजवण्यात आले. गीताचे बोल होते, 'वीर जवानों, तुम्हें न भूलेगा तुम्हारा हिंदुस्तान!'
 
==कारगीलविषयक पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/कारगिल" पासून हुडकले