"श्रावण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २८:
 
या महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ooV3Rz9zQvQC&pg=PA168&dq=%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80+%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjt4rX6ubTjAhVEbn0KHUXNDO4Q6AEIKjAA#v=onepage&q=%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&f=false|title=Images of Women in Maharashtrian Literature and Religion: A Translation of the Pratyabhijnahrdayam with an Introduction and Notes, by Ksemaraja|last=Feldhaus|first=Anne|last2=Feldhaus|first2=Professor of Religious Studies Anne|date=1996-01-01|publisher=SUNY Press|isbn=9780791428375|language=en}}</ref> याच दिवशी काही ठिकाणी [[शेतकरी]] [[पोळा]] नावाचा सण साजरा करतात.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=JC-014hKeKAC&pg=PA85&dq=pola+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiE7YPzvbTjAhVJfH0KHUMMDCkQ6AEIKjAA#v=onepage&q=pola%20festival&f=false|title=Fairs and Festivals of Indian Tribes|last=Tribhuwan|first=Robin D.|date=2003|publisher=Discovery Publishing House|isbn=9788171416400|language=en}}</ref>हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
 
==अधिक श्रावण मास==
साधारणपणे ८ किंवा ११ आणि क्वचित १९ वर्षांनी [[अधिक मास|अधिक श्रावण]] येतो. त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी हे नाव आहे. उत्तर हिंदुस्थानात या एकादश्यांना अनुक्रमे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात. एकादश्या वगळल्या तर [[अधिक मास|अधिक श्रावणात]] कोणतेही हिंदू सण किंवा व्रताचे दिवस येत नाहीत. [[अधिक मास|अधिक महिन्यात]] लग्नेही होत नाहीत. ज्यावर्षी [[अधिक मास|अधिक श्रावण]] असतो त्यावर्षी पाच माहिन्यांचा चातुर्मास असतो.
 
[[अधिक मास|अधिक श्रावण]] असलेली गेली आणि येणारी काही वर्षे : इसवी सन १९०१, १९०९, १९२०, १९२८, १९३९, १९४७, १९५८, १९६६, १९७७, १९८५ आणि २००४, २०२३, २०४२, २०६१...वगैरे.
 
==व्रते==
"https://mr.wikipedia.org/wiki/श्रावण" पासून हुडकले