"निर्मला पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

सामाजिक कार्यकर्त्या
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: निर्मला बळवंत पुरंदरे, माहेरच्या माजगांवकर (जन्म : ५ जानेवारी १९३...
(काही फरक नाही)

२०:२४, २१ जुलै २०१९ ची आवृत्ती

निर्मला बळवंत पुरंदरे, माहेरच्या माजगांवकर (जन्म : ५ जानेवारी १९३३; मृत्यू : २० जुलै २०१९) या ‘वनस्थळी’ संस्थेच्या संस्थापिका आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां होत्या. पुण्याला शिकायला येणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यासाठी त्या 'विद्यार्थी सहायक समिती'चे हाॅस्टेल चालवायच्या. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी खेड्यापाड्यातील स्त्रियांमधून बालवाडी शिक्षिका तयार केल्या.

निर्मलाताई या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी, ‘माणूस’ साप्ताहिकाचे संपादक श्री ग. माजगावकर आणि ‘राजहंस प्रकाशन’चे दिलीप माजगावकर यांच्या भगिनी होत. निर्मला पुरंदरे वीसहून अधिक वर्षे श्री. ग. माजगावकर यांच्या 'माणूस' या साप्ताहिकाच्या संपादकीय विभागात काम करीत होत्या.

गायिका-लेखिका माधुरी पुरंदरे या निर्मलाताईंच्या कन्या.

निर्मला पुरंदरे यांनी काही पुस्तकेही लिहिली आहेत, ती अशी :-

  • बालवाडीताई प्रशिक्षण
  • स्नेहयात्रा (प्रवासवर्णनपर)

निर्मला पुरंदरे यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

  • आत्मसिद्धा निर्मला पुरंदरे आणि मिशन 'वनस्थळी'ची चरितकथा (माणिक कोतवाल)


निर्मला बळवंत पुरंदरे यांना मिळालेले पुरस्कार

  • दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आदिशक्ती पुरस्कार (१९९८)
  • पुणे महापालिकेचा पुण्यभूषण पुरस्कार (२०१२)
  • महर्षी कर्वे संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार (२००३)
  • महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार (२००१)