"इस्तंबूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
'''इस्तंबूल''' ([[तुर्की भाषा|तुर्की]]: ''İstanbul'') हे [[तुर्कस्तान|तुर्कस्तानातील]] सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. [[मार्माराचा समुद्र]] व [[काळा समुद्र]] ह्यांना जोडणाऱ्या [[बॉस्फरसाची सामुद्रधुनी|बॉस्फरसाच्या सामुद्रधुनीच्या]] दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर [[आशिया]] तसेच [[युरोप]] या दोन्ही खंडात आहे. जगातील मोठ्या शहरांपैकी हे एकमेव शहरे असे दोन खंडांत आहे.
 
या शहराला प्राचीन काळात ''बायझेंटियम'' तसेच ''कॉन्स्टँटिनोपल'' या नावांनेहीनावांनीही ओळखण्यात येत असे. [[इ.स. ३३०]] पासून [[इ.स. १९२२]] पर्यंत सुमारे १,६०० वर्षांच्या कालखंडात हे शहर कोणत्या न कोणत्या साम्राज्याची राजधानी होते. [[इ.स. ३३०]] - [[इ.स. ३९५]] दरम्यान इस्तंबूल [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्याची]], [[इ.स. ३९५]] - [[इ.स. १२०४]] व [[इ.स. १२६१]] - [[इ.स. १४५३]] दरम्यान [[बायझेंटाईन साम्राज्य|बायझेंटाईन साम्राज्याची]], [[इ.स. १२०४]] - [[इ.स. १२६१]] दरम्यान [[लॅटिन साम्राज्य|लॅटिन साम्राज्याची]] तर [[इ.स. १४५३]] - [[इ.स. १९५३]] दरम्यान [[ओस्मानी साम्राज्य|ओस्मानी साम्राज्याची]] राजधानी होते.
 
सध्या इस्तंबूल जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०१२ साली येथे सुमारे १.१६ कोटी विदेशी पर्यटकांनी भेट दिली. २०१० मध्ये इस्तंबूल [[युरोपियन सांस्कृतिक राजधानी]]चे शहर होते. येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी १९८५ साली इस्तंबूलचा [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला.
 
[[इस्तंबूल अतातुर्क विमानतळ]] हा येथील प्रमुख [[विमानतळ]] असून [[तुर्की एअरलाइन्स]] ह्या तुर्कस्तानच्या राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]]चे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ इस्तंबूलमध्येचइस्तंबूलमध्ये आहे.
 
==खेळ==
[[फुटबॉल]] हा इस्तंबूलमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. [[गालातसराय एस.के.]], [[बेसिक्टास जे.के.]] आणि [[फेनर्बाचे एस.के.]] हे तीन प्रमुख फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. येथील इस्तंबूल पार्कमध्ये २००५ ते २०११ दरम्यान [[तुर्की ग्रांप्री]] ही [[फॉर्म्युला वन]] शर्यत भरवली गेली.
 
==इस्तंबूलवरील मराठी पुस्तके==
* इस्तंबूल इस्तंबूल (अनुवादित; मूळ इंग्रजी लेखक - बुऱ्हान सोनमेझ; मराठी अनुवादक - सविता दामले)
* इस्तंबुल टु अथेन्स (प्रवासवर्णन, लेखक -अच्युत बन)
* इस्तंबूल ते कैरो (लेखकाच्या मते [[इस्लाम]]ची दोन रूपे, आठवणी, लेखक - [[निळू दामले]])
 
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इस्तंबूल" पासून हुडकले