"राजा ढाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
 
==कारकीर्द==
ढालेंचा जन्म ३० सप्टेंबर १९४० रोजी [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] नांद्रे गावी झाला. ते तरूण असतानाच त्यांच्या आईवडीलांचे निधन झाले. त्यांनंतर ते कामा-काकू सोबत मुंबईला आले.<ref>https://indianexpress.com/article/india/raja-dhale-1940-2019-a-real-fighter-there-cant-be-another-ambedkarite-like-him-5833125/</ref>
 
त्यांनी सुरुवातीला '[[प्रबुद्ध भारत]]'मध्ये लिखाण केले. पँथरमध्ये सामील होण्यापूर्वी ढाले 'लिटल मॅगझिन' चळवळीत सक्रिय होते. साहित्यिक [[भालचंद्र नेमाडे]], वसंत गुर्जर, [[ज.वि. पवार]], सतीश काळसेकर यांच्यासह त्यांनी 'लिटल मॅगेझिन'ची चळवळ सुरू केली होती. राज्यात ठिकठिकाणी दलितांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांनी अमेरिकी कृष्णवर्णीय 'ब्लॅक पँथर' संघटनेच्या धर्तीवर '[[दलित पँथर]]' ही लढाऊ सामाजिक संघटना स्थापन केली. ते पँथरचे एक प्रमुख नेते होते. त्यांच्या नेतृत्वात इतर कार्यकर्त्यांनी [[मराठवाडा विद्यापीठ]] नामांतराचा लढा लढला. त्यानंतर दलित पँथरने अनेक लहान-मोठी आंदोलने केली. कालांतराने 'दलित पँथर' बरखास्त झाली. मास मूव्हमेंट, सम्यक क्रांती संघटना आदींचे ते संस्थापक सदस्य होते. त्यानंतर [[प्रकाश आंबेडकर]] यांच्या [[भारिप बहुजन महासंघ]] या पक्षाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. १९९९ साली ईशान्य मुंबईतून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. २००४ साली यांनी त्याच पक्षाकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही एक अयशस्वी निवडणूक लढवली.<ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/raja-dhale-kalwesh/articleshow/70248475.cms|title=राजा ढाले कालवश|date=17 जुलै, 2019|website=Maharashtra Times}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.esakal.com/sampadakiya/premanand-gajvi-writes-article-raja-dhale-200236|title=फोन खणखणला आणि पलीकडून आवाज आला, राजाभाऊ गेले...|website=www.esakal.com}}</ref><ref>{{Cite web|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/raja-dhale-dies-at-78-union-minister-ramdas-athawale-expresses-grief/articleshow/70248957.cms|title=कृतिशील विचारवंत हरपला: रामदास आठवले|date=17 जुलै, 2019|website=Maharashtra Times}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/राजा_ढाले" पासून हुडकले