"सुहास सोनावणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुहास सोनावणे (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक...
(काही फरक नाही)

१९:१६, ६ जुलै २०१९ ची आवृत्ती

सुहास सोनावणे (निधन : ५ जुलै २०१९) हे लेखक व जुन्या मुंबईचे अभ्यासक होते. मुंबईची खडानखडा माहिती होती. ते सुमारे तीस वर्षेपर्यंत वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये लेखन करत होते. माजी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांचे ते दीर्घ काळ स्वीय सचिव व केरळचे माजी राज्यपाल रा.सु. गवई यांचे काही काळ स्वीय सचिव होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्‍यांच्या चळवळी या विषयाचा अभ्यास केला होता.

सुहास सोनावणे यांनी लिहिलेली पुस्तके

  • डॉ. आंबेडकर आणि समकालीन
  • ग्रंथकार भीमराव
  • पुसलेली मुंबई (प्रकाशनाच्या वाटेवर, ६ जुलै २०१९)
  • मुंबई-कालची
  • शब्द फुलांची संजीवनी
  • सत्याग्रही आंबेडकर