"सासवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १:
'''सासवड''' हे [[पुणे शहर|पुण्याजवळचे]] छोटे शहर आहे. हे शहर [[पुरंदर]] तालुक्याचे मुख्यालय आहे.

==कऱ्हे पठार==
==कऱ्हेपठार==
महाराष्ट्राच्या शौर्यधैर्यादी वीर वृत्तीचे उगमस्थान त्यांचा आवडता सह्याद्री होय. सह्याद्रीची उत्तुंग शिखरे, बिकट कडे, खोल दऱ्या आणि त्याच्या आश्रयातील घनदाट अरण्ये ही आम्हां मराठ्यांच्या महाराष्ट्र वृत्तीची जननी आहे.

बापदेव घाटाजवळ एक दक्षिणोत्तर जाणारी डोंगररांग दिसते. पूर्वेच्या उजव्या बाजूस पुण्यापासून १० मैलांवर दिवे घाटाची दरड उभी आहे. दिवे घाट चढून गेले की, कऱ्हे पठाराची सीमा लागते. पूर्व-पश्चिम जाणारी ही डोंगररांग कर्णाकृती होऊन १०-२० मैल जाऊन विराम पावते. या पठाराच्या पूर्वेस आनंद भैरव नांदतो. साबगर खिंड, पानवडीची खिंड, पांगर खिंड आणि [[पुरंदर]] गड, [[वज्रगड]], जेजुरीगड प्रसिद्ध स्थळांत मोडतात. [[सिंहगड]] रांग व पुरंदर रांग या दोन्ही एका ३-४ मैलांच्या रांगेने एकमेकांस संलग्न होतात.

आणि ह्या तिन्हीही रांगामुळे एक मोठे विस्तृत पठार तयार झाले होतेआहे, या पठाराला कऱ्हे पठार म्हणतात. या पठाराची व्याप्ती सुमारे १०० चौरस मैलाची आहे. या पठाराच्या एका टोकास [[भुलेश्वर]] व दुसऱ्या टोकास मल्हारी मार्तंड उभे आहेत. आणि या पठाराच्या गर्भातून कऱ्हामाईचा झुळझुळ प्रवाह वाहत आहे. या प्रदेशावर पुराणप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध अनेक स्थळांची गर्दी झालेली दिसून येईल.

भागवतधर्माचे सासवडचे [[संत सोपान देव]], गणेशभक्तांचे आधिदैवत श्री मोरेश्वर आणि कऱ्हेच्या पावन तीरावरील स्वयंभू शिवालये ही या विस्तीर्ण पठाराची भूषणे आहेत. श्रीशिवरायांनी स्वराज्याचा पाया इथेच घातला. मोगलांशी लढता लढता स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर यांनीयाने येथेच देह ठेवला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला येथून जवळच आहे.. व पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचा उपक्रम इथेच केला. शिवकालीन स्वराज्याचे निष्ठावंत शूर सेवक जाधववाडीचे पिलाजीराव जाधवराव, पानिपतच्या संग्रारमातून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा भिवडीचा जानू भिंताडा, नारायणराव पेशवे यांच्या वधप्रसंगी स्वामिनिष्ठेने धन्यास वाचविण्याच्या प्रयत्नांत अंगाच्या खांडोळ्या झालेला एखतपूरचा स्वामिभक्त चाफाजी टिळेकर, अठराशे सत्तावनच्या क्रांतीनंतर इंग्रजांना सतावून सोडणारा भिवडीचा शूर [[उमाजी नाईक]], प्रसिद्ध समाजसुधारक सत्यशोधक महात्मा फुले, लावणीकार पठ्ठे बापूराव व सगन भाऊ, होनाजी बाळा आदींच्या कर्तबगारीने, धैर्यशौर्याने उजळून निघालेले हेच ते कऱ्हेपठार.

कऱ्हे पठारालाच काहीजण कडे पठार म्हणतात.

== कऱ्हामाई ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सासवड" पासून हुडकले