"द्रौपदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
द्रोणाचार्य यांनी द्रुपद राजास युद्धात हरवून अर्धे राज्य घेतल्यामुळे [[द्रोणाचार्य|द्रोणाचार्यांचा]] वध करण्यासाठी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या ज्वाळांमधून द्रौपदी व धृष्टद्युम्न ही जुळी बहीण भावंडे बाहेर आली. ही बहीण भावंडे कुमारवयीन होती.. द्रुपदाची कन्या म्हणून तिला द्रौपदी असे म्हणत पण तिचे खरे नाव कृष्णा होते व ते तिच्या सावळ्या रंगामुळे पडले होते. तिच्या शरीरास कमळासारखा सुगंध येत असे. तिच्या सौंदर्याची स्तुती दूरवर पसरलेली होती. तिला कल्याणी असे देखील म्हटले जात असे.
 
==द्रौपदीची नावे==
द्रौपदीला आणखीही काही नावे होती. बरेच वेळा असा गैरसमज करून घेतला जातो की द्रौपदीचा पाच पांडवांशी विवाह झाला, म्हणून तिला पांचाली म्हणतात. खरे तर ती [[पांचाल]] राज्याची राजकन्या म्हणून तिला पांचाली म्हटले जात असे. यज्ञातून उत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी असे देखील म्हटले जाई.
द्रौपदी, पांचाली, याज्ञसेनी, सैरंध्री
 
[[कृष्ण]] हा दौपदीचा मानलेला भाऊ आणि सखा होता.
 
== पण व पांडवांशी विवाह ==
द्रौपदी जेव्हा उपवर झाली तेव्हा द्रुपदाने कृष्णाच्याच सल्ल्याने तिच्या विवाहासाठी एक पण आयोजित केला होता. छताला लावलेल्या फिरत्या माशाचे प्रतिबिंब जमिनीवर पाण्याने भरलेल्या कुंडात पडेल, अशी व्यवस्था केली गेली होती. पाण्यातील माशाचे प्रतिबिंब पाहून जो कुणी नेम धरून माशाचा डोळा फोडेल, त्यालाच द्रौपदी वरेल, असा तो पण होता. ब्राह्मणवेषातील अर्जुनाने हा पण जिंकला. त्यावेळीद्रौपदीला पांडवांचेघरी स्वयंवरातआणल्यावर उपस्थितअर्जुनाने क्षत्रियांशीआपल्या युद्ध(कुंती) झालेआईला होतेघराबाहेर उभे राहून भिक्षा आणल्याचे सांगितले. मात्रकुंतीने कुंतीच्यानेहमीच्या तोंडूनसवयीप्रमाणे अनवधानानेभिक्षा निघालेल्या'सर्व शब्दांमुळेभावंडांनी द्रौपदीलावाटून अर्जुनासोबतघ्या' इतरअसे चारम्हटले. पांडवांनादेखील वरावेत्याचा लागलेफायदा घेऊन धृतराष्ट्राने ही सर्वांची पत्नी होईल असे ठरवले. त्याप्रमाणेच झाले आणि द्रौपदी पाचही पांडवांची सामाईक पत्नी झाली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mahabharatastories.in/reality-dropadi-swayamvara-battle-karna-arjuna/|शीर्षक=Reality Dropadi Swayamvara Battle {{!}} Mahabharata Stories|last=devdattdhakane|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-01-17}}</ref>
 
पाच पांडवांशी विवाह झालेला असूनही द्रौपदीस पतिव्रता म्हटले जाते. अहिल्या, सीता, तारा व मंदोदरी यांच्यासोबतच द्रौपदीचे नावदेखील पंचकन्यांमधे आदराने घेतले जाते. श्रीकृष्णाची दुसरी पत्‍नी सत्यभामा हिने गृहिणीपद व पतीची मर्जी कशी सांभाळावी याबद्दल द्रौपदीकडून सल्ला घेतला होता. या संवादालाच [[द्रौपदी-सत्यभामा-संवाद]] असे म्हणतात.
 
== द्यूतप्रसंग आणि वस्त्रहरण ==
महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या द्यूतप्रसंगी धृतराष्ट्र पुत्र [[दुर्योधन]] व [[दुःशासन|दुःशासनाकरवी]] झालेले वस्त्रहरण हा द्रौपदीच्या जीवनातील सर्वात मोठा मानहानीचा प्रसंग होता. त्या प्रसंगातदेखील द्रौपदीने आपल्या संयमाची व बुद्धिमत्तेची चुणूक सभाजनांना दाखवून दिली होती. "माझ्या पतीने आधी स्वतःला पणाला लावले असल्यासअसल्याने व ते हरले असल्याने, नंतर मला पणाला लावण्याचा अधिकार त्यांना उरतो का?" या तिच्या प्रश्नाने भीष्म पितामहांनादेखील निरुत्तर केले होते. वस्त्रहरणासारख्या प्रसंगामधे पतींनी सर्व अधिकार गमावल्यानंतर द्रौपदीने आपला सखा कृष्ण याचा धावा केला होता. तिच्या हाकेला प्रतिसाद देत कृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण केले.
 
दुर्योधनवस्त्रहरणाच्या वेळी दुर्योधनाने द्रौपदीला आपली मांडी उघडी करून दाखवली. ही मांडी मी युद्धात फोडीन अशी गर्जना भीमाने केली. दुर्योधनाच्या व दुःशासनाच्या हीन कृतींकडे दुर्लक्ष करणाऱ्या धृतराष्ट्रालादेखील द्रौपदीच्या वक्तव्याची दखल घेणे भाग पडले होते. आपल्या पुत्रांना द्रौपदीच्या शापांपासून वाचविण्यासाठी धृतराष्ट्राने तिला अनेक वरदाने देऊ केली होती, मात्र क्षत्रिय स्त्रीच्या धर्मानुसार आपल्याला केवळ दोनच वर मागण्याचा अधिकार आहे, असे उत्तर देऊन द्रौपदीने स्वतःवर ओढवलेल्या लाजिरवाण्या प्रसंगातदेखील आपल्या इच्छांवर असलेला संयम व ताळ्यावर असलेले चित्त दाखवून दिले होते. द्रौपदीच्या चतुराईमुळेच पांडव व त्यांचे पुत्र, त्यांच्या रथ व अस्त्र -शस्त्रांसकट दुर्योधनाच्या दास्यत्वातून मुक्त होऊ शकले होते व त्यांना त्यांचे राज्यदेखील परत मिळाले होते. पण युधिष्ठिराच्या द्यूतलालसेमुळे त्यांना पुढच्याच क्षणी राज्य गमवावे देखील लागले व बारा वर्षांचा [[वनवास]] आणि एक वर्षाचा [[अज्ञातवास]] त्यांच्या नशिबी आला.
 
द्रौपदीने अशी प्रतिज्ञा केली होती की तिच्या केसांना धरून ओढणाऱ्या दु:शासनाच्या छातीचे रक्त जोपर्यंत ती आपल्या केसांना लावणार नाही, तोपर्यंत ती केस मोकळेच ठेवेल. भीमाने महाभारतातील युद्धामधे दुःशासनाचा वध करून, त्याची छाती फोडली आणि त्याचे रक्त द्रौपदीच्या केसांना लावून तिची वेणी घातली व द्रौपदीची प्रतिज्ञा पूर्ण केली. युद्ध संपल्यावर एका विहिरीत लपून बसलेल्या दुर्योधानाला बाहेर काढून भीमाने त्याची मांडी फोडली आणि त्याचे रक्त पिऊन शेवटी त्याचा प्राण घेतला.
 
== वनवासात आणि महाभारतीय युद्धात ==
वनवासातदेखील द्रौपदीचे अपहरण करण्याचा प्रयत्‍न कौरवांचा मेव्हणा व [[दुःशला|दुःशलेचा]] पती [[जयद्रथ]] याने केला होता. मात्र युधिष्ठिरामुळे त्याला जीवदान मिळाले. अज्ञातवासाच्या काळात द्रौपदीने आपली ओळख लपविण्यासाठी सैरंध्री हे नाव वापरले होते. सैरंध्रीचा अर्थ रूपसज्जा करण्यास मदत करणारी राणीची दासी. [[विराट]] राजाची पत्‍नी [[सुदेष्णा]] हिच्या महालात सैरंध्रीच्या रूपात काम करतानादेखील सुदेष्णेचा भाऊ व विराट राजाचा सेनापती [[कीचक]] याने द्रौपदीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्‍न केला.
 
द्रौपदीने विवाहापूर्वी अर्जुनाला मनाने वरले असले तरी तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा पति म्हणजे भीम. द्यूतप्रसंगी दुर्योधनाने केलेल्या द्रौपदीच्या अपमानाचा प्रतिशोध म्हणून त्याने दुर्योधनाची मांडी फोडण्याची प्रतिज्ञा केली होती, ती त्याने महाभारताच्या युद्धातयुद्धानंतर पूर्ण केली. वनवासामध्ये तिला सुवर्णकमळे हवी असतानादेखील आपले कौशल्य पणास लावणारा भीमच होता. ती सैरंध्रीच्या रूपात असताना तिच्यावर अतिप्रसंग करू पहाणाऱ्या [[कीचक|कीचकाचा]] वध करण्याचे काम भीमानेच केले होते.
 
द्रौपदीला युधिष्ठिरापासून [[प्रतिविंध्य]], भीमापासून [[श्रुतसोम]], अर्जुनापासून [[श्रुतकर्मा]], नकुलापासून [[शतानीक]] व सहदेवापासून [[श्रुतसेन]] असे पाच पुत्र झाले होते. परंतु दुर्दैवाने [[द्रोणाचार्य]]-पुत्र [[अश्वत्थामा]] याने महाभारत युद्धसमाप्तीनंतर एके रात्री एकाच राहुटीमधे झोपलेल्या या सर्व मुलांना पांडव समजून मारून टाकले होते. आयुष्याच्या उत्तरार्धात पाच पांडवांसह निवृत्तीसाठी द्रौपदीनेदेखील नगेंद्र हिमालयाचा मार्ग धरला होता. मात्र पर्वताच्या पायथ्याशीच ती कोसळून पडली.
"https://mr.wikipedia.org/wiki/द्रौपदी" पासून हुडकले