"भानू अथैय्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Bhanu Athaiya.jpg|right|thumb|250px|भानू अथैय्या]]
'''भानू अथैय्या''' (''पूर्ण नाव'' - '''भानुमती आण्णासाहेब राजोपाध्ये''') (''जन्म'' - [[२८ एप्रिल]], [[इ.स. १९२६]]; [[कोल्हापूर]]) या भारतीय [[चित्रपट]] क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय [[ऑस्कर पुरस्कार]] विजेत्या भारतीय वेषभूषाकार आहेत.
 
भानू अथैय्या यांच्या त्यांच्या आईचे नाव शांताबाई होते. वडील अण्णासाहेब राजोपाध्ये छत्रपतींचे पुरोहित होते. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून भानुमतींनी चित्रकलेशी दोस्ती केली. तर त्याच दरम्यान त्यांनी ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. भानुमती ९ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची चित्रकलेविषयीची आवड पाहून त्यांच्या आईने घरीच चित्रकलेसाठी शिक्षक ठेवले. शालेय शिक्षण संपताच त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. शेवटच्या वर्षी त्यांना सुवर्णपदक मिळाले.
 
== कार्य ==
भानू अथैय्या यांनी [[इ.स. १९५०]] पासून सुमारे १०० चित्रपटांसाठी काम केले आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दिनांक=२७ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | दुवा=http://www.esakal.com/esakal/20120227/5320507365017880330.htm | प्रकाशक=[[सकाळ (वृत्तपत्र)]] | भाषा=मराठी | शीर्षक=वेशभूषाकार भानू अथैयांना ऑस्करच्या सुरक्षेची काळजी | ॲक्सेसदिनांक=१५ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref> [[गुरु दत्त]], [[राज कपूर]], [[आशुतोष गोवारीकर]], [[यश चोपडा]] यासारख्या दिग्दर्शकांबरोबरच कोनराड रूक्स, [[रिचर्ड ॲटनबरो]] यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकांबरोबरही काम केले आहे.
 
==कारकीर्द==
एकोणीसशे साठच्या दशकात टाईस ऑफ इंडियाच्या ‘ईव्हज वीकली’मधील भानू यांची रेखाटने पाहून अभिनेत्री नरगिस प्रभावित झाल्या. नरगिस यांच्यामुळेच भानू यांना राज कपूरच्या ‘श्री ४२०’ च्या वेषभूषेचे काम मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गुरुदत्त यांचा ‘साहिब, बीबी और गुलाम’, देव आनंद यांचा ‘गाईड’, ‘आम्रपाली’, शम्मी कपूर यांचा ‘ब्रम्हचारी’, शाहरूख खान यांचा ‘ओम् शांती ओम्’ इ. हिंदी चित्रपटांतून वेषभूषेचे काम करता करता त्यांना रिचर्ड अ‍ॅटेनबरोच्या ‘गांधी’साठी काम करण्याची संधी मिळाली आणि या चित्रपटातील गांधीजींच्या वेषभूषेसाठी भानू अथैय्या यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले. जोम मोलो यांच्याबरोबर विभागून हे पारितोषिक मिळाले होते. हे पारितोषिक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत. तसेच ‘लगान’, ‘स्वदेश’ यासारख्या चित्रपटांमधील कलाकारांच्या वेषभूषा त्यांनी समर्पकपणे साकारल्या.
 
भानू यांनी अमोल पालेकरांच्या ‘महर्षी कर्वे’ या मराठी चित्रपटासाठीही वेषभूषा केली होती.
 
दाक्षिणात्य वेषभूषाकार सत्येंद्र अथैय्या यांच्याशी त्यांनी विवाह केला.
 
== पुरस्कार ==
* [[ऑस्कर पुरस्कार]] - [[इ.स. १९८२]] : [[गांधी (चित्रपट)|गांधी चित्रपटातील]] वेशभूषा संकल्पनेसाठी जॉन मोल्लोमोलो यांच्यासह विभागून.
* [[फिल्मफेअर पुरस्कार]] - [[इ.स. २००९]] : जीवनगौरव पुरस्कार.
 
== संदर्भ आणि नोंदी ==