"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४१:
 
==[[नक्षत्र]]==
नक्षत्रे (Constellations)आणि राशी (Zodiac sign) म्हणजे अवकाशातील विशिष्ट पट्ट्यातील ठळक तारका समूह. [[सूर्य (ज्योतिष)|सूर्य]], [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] आणि ग्रह आकाशातून ज्या पट्ट्यातून फिरत फिरत पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात त्या पूर्ण पट्ट्याचे ३६० अंश कल्पून त्या मार्गाचे ३०-३० अंशाचे बारा भाग पाडले आहेत. त्या एका भागाला रास किंवा [[राशी]] म्हणतात. तसे २७ भाग पाडले तर प्रत्येक भागात एक अशी २७ [[नक्षत्र|नक्षत्रे]] होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा होतो. ही नक्षत्रे म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूह. त्यातील एका ठळक ताऱ्याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात. प्रत्येक नक्षत्राचे चार पाद (चरण) असतात. त्यामुळे सव्वा दोन नक्षत्रांची म्हणजे नऊ चरणांची एक राशीरास होते.
 
नक्षत्रातल्या ताऱ्यांनी व्पापलेली आकाशातली जागा आणि ३० अंश आकाशाने व्यापलेली जागा तंतोतंत समान नसते. त्यामुळे नक्षत्राचे काही तारे राशीच्या बाहेर राहिलेले असू शकतात किंवा नक्षत्राच्या ताऱ्यांनी व्यापूनही राशीची थोडीफार जागा रिकामी असू शकते.
 
==रास, नक्षत्रे आणि त्यांचे चरण==
 
एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे-नऊ नक्षत्रचरणे- येतात. एका राशीत ३० अंश असतात. अश्या बारा राशी आहेत. एका नक्षत्रात चार चरणे असतात.
 
मेष = अश्विनीचे ४ चरण, भरणीचे ४ आणि कृत्तिकाचा पहिला चरण.
 
वृषभ = कृत्तिकाचे शेवटचे ३ चरण, रोहिणीचे ४ चरण आणि मृग नक्षत्राचे पहिले दोन चरण.
 
मिथुन = मृग नक्षत्राचे मागले २ चरण, आर्द्राचे ४ चरण आणि पुनर्वसूचे पहिले ३ चरण.
 
कर्क = पुनर्वसूचा चौथा चरण, पुष्यचे ४ चरण आणि आश्लेषाचे ४ चरण.
 
सिंह = मघाचे ४ चरण, पूर्वाफाल्गुनीचे ४ चरण आणि उत्तराफाल्गुनीचा पहिला चरण.
 
कन्या = उत्तराफाल्गुनीचे उरलेले ३ चरण, हस्त नक्षत्राचे ४ चरण आणि चित्राचे पहिले २ चरण.
 
तुला = चित्राचे बाकीचे २ चरण, स्वातीचे ४ चरण आणि विशाखा नक्षत्राचे पहिले तीन चरण.
 
वृश्चिक = विशाखाचा चौथा पाद, अनुराधाचे ४ आणि ज्येष्ठा नक्षत्राचे चारही ४ चरण.
 
धनु = मूळ नक्षत्राचे ४ चरण, पूर्वाषाढाचे ४ आणि उत्तराषाढाचा पहिला चरण.
 
मकर = उत्तराषाढाचा दुसरा, तिसरा आणि चौथा पाद, श्रवण नक्षत्राचे ४ आणि धनिष्ठाचे पहिले दोन पाद.
 
कुंभ = धनिष्ठाचे मागचे २ चरण, शततारकाचे ४ चरण आणि पूर्वाभाद्रपदा नक्षत्राचे पहिले तीन चरण.
 
मीन = पूर्वाभाद्रपदाचा चौथा, उत्तराभाद्रपदाचे ४ आणि रेवती नक्षत्राचे ४ चरण.
 
==२८वे नक्षत्र==
अभिजित नावाचे फक्त १९ घटी असलेले २८वे नक्षत्र, उत्तराषाढाच्या शेवटच्या १५ घटी आणि श्रवण नक्षत्राच्या सुरुवातीच्या ४ घटी मिळून बनते असे मानले गेले आहे. अभिजितचे चारही चरण मकर राशीत असल्याचे सांगितले जाते. एक घटी म्हणजे नक्षत्राचा साठावा भाग.
 
==अधिक माहिती==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले