"भीम ॲप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भीम अॅप कडे पुनर्निर्देशित

भीम अॅप ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १:
{{गल्लत|रेडिओ जय भिम}}
#पुनर्निर्देशन [[भीम अॅप]]

[[File:BhimAppLogo.jpg|thumb]]
'''भीम ॲप''' म्हणजे '''भारत इंटरफेस फॉर मनी''' हे एक [[मोबाईल फोन|मोबाईल]] ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनची निर्मिती "नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया" या [[भारत सरकार]]च्या आर्थिक देवाण घेवाण प्रणाली विकसित व देखभाल करणाऱ्या संस्थेने केली आहे. [[भारतरत्न]] [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या ‘भीमराव’ या नावावरून या ॲपला ''भीम'' हे नाव देण्यात आले आहे. सध्या हे ॲप [[ॲन्ड्रॉइड]] व आयओएस या मोबाईल संगणक प्रणालींवर वापरण्यासाठी उपलब्ध आहे. आत्तापर्यंत हे ॲप १ कोटी ४० लाख जणांनी मोबाईलवर डाऊनलोड केले आहे. हे ॲप [[युनिफाईड पेमेंट इंटरफेस]] या प्रणालीवर आधारित आहे.

==सभासद==
भारतातल्या ४४ राष्ट्रीय आणि खाजगी बँका या ॲप्लिकेशनच्या सभासद आहेत. या ॲप्लिकेशनचा वापर करून आपण ४४ बँकांपैकी कुठल्याही बँकेतल्या स्वतःच्या खात्यातून पैशांची डिजिटल देवाण घेवाण करू शकतो.

==बँकांची यादी==
* १. ॲक्सिस बँक
* २. अलाहाबाद बँक
* ३. आंध्र बँक
* ४. आयडीएफसी बँक
* ५. आयडीबीआय बँक
* ६. आयसीआयसीआय बँक
* ७. आरबीएल बँक
* ८. इंडसइंड बँक
* ९. इंडियन ओव्हरसीज बँक
* १०. इंडियन बँक
* ११. एचएसबीसी बँक (हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड)
* १२. एचडीएफसी बँक (हाउसिंग डेव्हलपमेन्ट ॲन्ड फायनान्सिंग कॉर्पोरेशन बँक)
* १३. ओरियेन्टल बँक ऑफ कॉमर्स
* १४. कॅथॉलिक सिरियन बँक
* १५. कॅनरा बँक
* १६. करूर वैश्य बँक
* १७. कर्नाटक बँक
* १८. कोटक महिंद्र बँक
* १९. कॉर्पोरेशन बँक
* २०. टीजेएसबी (ठाणे जनता सहकारी बँक)
* २१. डीसीबी बँक
* २२. देना बँक
* २३. पंजाब नॅशनल बँक
* २४. फेडरल बँक
* २५. बँक ऑफ इंडिया
* २६. बँक ऑफ बडोदा
* २७. बँक ऑफ महाराष्ट्र
* २८. युको बँक (युनायटेड कमर्शियल बँक)
* २९. युनायटेड बँक ऑफ इंडिया
* ३०. युनियन बँक ऑफ इंडिया
* ३१. येस बँक
* ३२. लक्ष्मी विलास बँक
* ३३. विजया बँक
* ३४. साउथ इंडियन बँक
* ३५. सिटी युनियन बँक
* ३६. सिंडिकेट बँक
* ३७. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
* ३८. स्टँडर्ड चार्टर्ड बँक
* ३९. स्टेट बँक ऑफ
* ४०. स्टेट बँक ऑफ
* ४१. स्टेट बँक ऑफ इंडिया
* ४२. स्टेट बँक ऑफ
* ४३. स्टेट बँक ऑफ
* ४४. स्टेट बँक ऑफ

==पर्याय==
या ॲपवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी कुठल्याही एका पर्यायाचा वापर करून देवाणघेवाण करता येते.

* पैसे पाठवण्यासाठी :

१. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड वापरून. किंवा

२. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून. किंवा

३. ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.

* पैसे स्वीकारण्यासाठी :

१. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस वापरून.

२. ज्याच्याकडून पैसे स्वीकारायचे आहेत त्याचा मोबाईल क्रमांक वापरून.

३. स्वतःचा क्यूआर कोड वापरून.

[[वर्ग:बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके]]
[[वर्ग:ॲप]]
[[वर्ग:भारत सरकार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भीम_ॲप" पासून हुडकले