"गुणाकर देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गुणाकर गुणवंत देशपांडे (जन्म : वाटखेड-यवतमाळ, ३१ मे १९३०; मृत्यू : ?)...
(काही फरक नाही)

२२:१३, २३ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

गुणाकर गुणवंत देशपांडे (जन्म : वाटखेड-यवतमाळ, ३१ मे १९३०; मृत्यू : ?) हे एक मराठी लेखक होते. नागपूर विद्यापीठातून एम.एस्‌सी. व पुणे विद्यापीठातून पीएच.डी केल्यावर गुणाकर देशपांडे व्हिएन्नाला गेलेव त्यांनी तेथील विएन विद्यापीठाच्या फॅकल्टी ऑफ फिलाॅसाॅफीचे एक पोस्टग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्राप्त केले. परदेशातून भारतात आल्यावर गुणाकर देशपांडे आधी नागपूर विद्यापीठात भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक झाले व नंतर सन १९६९ ते १९७७ या काळासाठी पुणे विद्यापीठात प्रपाठक व पीएच.डी.चे मार्गदर्शक राहिले. १९७७ ते १९७९ या कालावधीत ते अणुशक्ती महामंडळाचे सल्लागार होते.

नागपूरला असल्यापासूनच गुणाकर गुणवंत देशपांडे यांनी ग्रंथलेखनास सुरुवात केली होती. त्यांनी लिहिलेली पुस्तके :-

  • Geology of Maharashtra (इंग्रजी, १९९८)
  • जिव्हाळी (कवितासंग्रह, १९६१)
  • भारताची खनिजे (अनुवादित, १९६८)

जी.जी. देशपांडे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

  • भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाची सीनिअर संशोधक शिष्यवृत्ती
  • युनेस्कोची फेलोशिप
  • वाटुमल प्रतिष्ठानचा पुरस्कार