"भारतातील राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
१५ मार्च २०१९ रोजी, [[भारतीय निवडणूक आयोग]]ाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ७ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय ([[महाराष्ट्र नवनिर्माण सेना|मनसे]] व [[शिवसेना]]) पक्ष आहेत.
 
भारतात सुमारे २३३४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. काँंग्रॆस, तृणमूल काँग्रॆस, राष्ट्रीय काँंग्रॆस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
 
मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.
 
२०१८ साली,
 
* देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द आहेत.
* देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द आहे.
* देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द आहेत.
* देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द आहेत.
* देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द आहे.
* देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रॆस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द आहे.
* देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत आहेत.
 
* उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष आहेत, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
* दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहॆ; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
* बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहॆ, त्या राज्यात १२० पक्ष आहेत.
* तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
* ४.९ कोटी लॊकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष आहेत.
 
काही 'खास' नावांचे पक्ष :-
 
* अखिल भारतीय गरीब पार्टी (गाझियाबाद-उत्तर प्रदेश)
* अखिल भारतीय राष्ट्रीय परिवार पार्टी (वाराणसी-उत्तर प्रदेश)
* अंजान आदमी पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
* आजादीका अंतिम आंदोलन दल (रायपूर-छत्तीसगड)
* आधी आबादी पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
* आप सबकी अपनी पार्टी (विलासपूर-छत्तीसगड)
* आर्थिक व्यवस्था परिवर्तन पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
* ऑल इंडिया गांधी काँग्रॆस (बंगलोर-कर्नाटक)
* बेरोजगार आदमी अधिकार पार्टी (फरीदाबाद-हरियाणा)
* भारत की लोक जिम्मेदार पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
 
== राष्ट्रीय पक्ष ==