"हॅम्लेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १७:
शुभारंभाचे प्रयोग : रवींद्र नाट्य मंदिर येथे २७ एप्रिल २०१८
 
==हॅम्लेटची कथा==
हॅम्लेट हे एक सूडनाट्य आहे. हॅम्लेटच्या एकलेपणाची ती शोकांतिका आहे. डेन्मार्कचा राजा असलेल्या वडिलांच्या खुनानंतर हॅम्लेटचा काका राजपुत्र हॅम्लेटच्या आईबरोबर विवाह करतो. इतक्या घाईघाईत आईने त्याला राजी व्हावे, हे त्या राजपुत्र हॅम्लेटला पटत नाही. तो वडिलांच्या मृत्यूनंतर दुःखीकष्टी झालेला असतो. त्याला वडिलांच्या हत्येचा सूड घ्याचा असतो, पण तो पुरता गोंधळात पडलेला असतो (तसेच इतरांना देखील त्याच्या वागणुकीवरून गोंधळात टाकतो). आईच्या व्यभिचारी वर्तनाचा देखील त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो, एकूणच घृणा वाटत असते. काय करावे त्याला समजत नाही (जगावे की मरावे, to be or not to be, हे ह्या नाटकातीलच हॅम्लेटच्या तोंडी असलेले प्रसिद्ध वाक्य. ह्या नाटकात स्वगे देखील बरीच आहेत). ह्या सगळ्यातून तो त्याच्यावर प्रेम असलेल्या मुलीच्या प्रेमावर देखील शंका घेऊ लागतो. ह्या सगळ्यातून तो सूड घेतो. नाटकादरम्यान त्याचा मानसिक प्रवास आपल्या समोर उलगडत जातो.
 
नाटकात भुताचे एक पात्र आहे. ते हॅम्लेटला वडिलांच्या खुनाबद्दल माहिती देण्यासाठी निर्माण केले आहे. खरेतर नाटक त्याच प्रसंगापासून सुरू होते. ते ज्या पद्धतीने सादर केले गेले आहे, तेथेच प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेते. शेवटी तलवारबाजीचा द्वंद्वाचा प्रसंग आहे. नाटकात अनेक भावभावनांचे प्रदर्शन आहे. हॅम्लेट वडिलांच्या खुनाचा सूड घेण्यासाठी एका नाटक मंडळीला पाचारण करतो, आणि नाटक सादर करायला लावतो. त्यावेळेस त्याच्या तोंडी शेक्सपिअरने अभिनायासंबंधी, नाटकासंबंधी काही विचार मांडले आहेत, ते देखील टाळ्या खेचणारे आहेत.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅम्लेट" पासून हुडकले