"विनय वाईकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
वाईकर हे [[भारतीय लष्कर|भारतीय लष्कराच्या]] वैद्यक सेवेत दहा वर्षे होते. १९६३,१९६५ आणि १९७१ अशा तीन युद्धांचा अनुभव घेऊन ते मेजर या हुद्यावरून निवृत्त झाले. प्रभावी वक्ता, कथाकथनकार व कवी असलेल्या डॉ. वाईकरांच्या युद्धकथा आणि ललित लेखन प्रकाशित झाले आहे. मराठीसोबतच हिंदी, उर्दू आणि इंग्लिश भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी गझल या विषयाखेरीज युद्धकथा, दोन अंकी नाटके लिहिली व शिवाय वर्तमानपत्रांत विविधांगी विषयांवर ललित लेखन केले.
 
विदर्भातल्या अकोला शहरात इ.स. १८६४ साली सुरू झालेल्या [[बाबुजी देशमुख व्याख्यानमाला|बाबुजी देशमुख या नामांकित व्याख्यानमालेत]] विनय वाईकर यांचे भाषण झाले होते.
 
दूरचित्रवाणीवरील 'नाती' या मालिकेचे लेखन वाईकरांचे होते.