"गाडगे महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''गाडगे महाराज''' (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६; मृत्यू: २० डिसेंबर १९५६) हे '''गाडगे बाबा''' म्हणून ओळखले जाणारे [[महाराष्ट्र]] राज्यातील एक [[कीर्तनकार]], [[संत]] आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते [[सामाजिक न्याय]] देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.{{संदर्भ हवा}}
 
संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते
वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक
जन्मदिन : फेब्रुवारी २३, १८७६
 
गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
 
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. gavacha ka maidan Amethi kirthana Sathi kanyakubja Hote
#
 
#
==गाडगे महाराजांची चरित्रे==
* असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
* ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
* कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
* गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
* गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
* श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन ([[गो.नी. दांडेकर]])
* Shri Gadge Maharaj (इंग्रजी, [[गो.नी. दांडेकर]])
* गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, [[नारायण वासुदेव गोखले]])
* गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
* निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
* मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
* लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. [[द.ता. भोसले]])
* संत गाडगेबाबा ([[गिरिजा कीर]])
* संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
* संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
* Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
* संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
* श्रीसंत गाडगे महाराज ([[मधुकर केचे]])
* संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
* समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
* स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
 
==बाह्य दुवे==