"संत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
(चर्चा | योगदान)
ओळ २३:
 
== संत विषयावरची पुस्तके ==
* तुकाराम दर्शन ; लेखक ([[सदानंद मोरे]])
* संतदर्शन चरित्रग्रंथ संच (१३ पुस्तके, संपादन- डॉ. [[सदानंद मोरे]], अभय टिळक), श्री गंधर्ववेद प्रकाशन (पुणे)
* संतांची मांदियाळी (संकलक - मुक्ता केणेकर. ‘संतांची मांदियाळी’ या उपक्रमाच्या व्याख्यानमालेतील निवडक व्याख्यानांचे संकलन)
 
तुकाराम दर्शन ; लेखक सदानंद मोरे
==संतदर्शन चरित्रग्रंथ संचातली पुस्तके==
* काळजयी कबीर (अंशुमनी दुनाखे) : [[संत कबीर]] यांच्यावरील लिहिलेला चरित्रग्रंथ.
* चार भावंडे (डॉ. [[सदानंद मोरे]]) : ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांवर आधारित पुस्तक. लेखकाने या पुस्तकात या चार अलौकिक संतांच्या कार्यकर्तृत्वाचे विस्तृत आणि मूलगामी चिंतन मांडले आहे. ज्ञानदेवांच्या काळातील राजकीय, सामाजिक परिस्थिती, धर्मकारण, प्रथा परंपरा, लोकव्यवहार, अन्य उपासना, संप्रदाय, त्यांच्यातील अनुबंध, वादविवाद, आक्षेप यांचा चिकित्सक आढावा तर पुस्तकात घेतला आहेच; शिवाय त्यांच्या जीवन चरित्रांतील प्रत्येक घटनेचं विश्लेषण करताना अनेक महत्त्वाच्या ग्रंथांचा संदर्भ देत अनेक वादग्रस्त मुद्दय़ांचे तर्कशुद्ध खंडनही केले आहे. त्यांचे हे सारभूत लेखन वाचकांचा दृष्टिकोन अधिक प्रगल्भ करणारे आहे.
* तुकाराम महाराजांचा शिष्यपरिवार (शोभा घोलप) : तुकोबांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडून त्यांच्या वाङ्मयाचे जीवावर उदार होऊन जतन करणाऱ्या संताजी जगनाडे, तुकयाबंधू कान्होबा, श्रीसंत नारायण महाराज, कचेश्वर ब्रrो आणि रामेश्वरभट वाघोलीकर यांची चरित्रे व त्यांची काव्याबद्दलची दुर्मीळ माहिती या ग्रंथात आली आहे.
* नामदेवांची प्रभावळ (शिवाजीराव मोहिते) या पुस्तकात संत [[गोरा कुंभार]], राका कुंभार, परिसा भागवत, नरहरि सोनार, जोगा परमानंद, जगन्मित्र नागा नामदेवांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या चरित्र आणि अभंग संपदेविषयीची दुर्मीळ माहिती मिळते.
* बहिणी फडकती ध्वजा (रूपाली शिंदे) : वारकरी संप्रदायात संत बहिणाबाईंच्याविषयी व त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देणारे पुस्तक. तत्कालीन सामाजिक बंधनं आणि रूढींना टक्कर देत परमार्थ साधताना स्त्री म्हणून करावा लागलेला संघर्ष बहिणाबाईंच्या आत्मचरित्रपर अभंगांत दिसून येतो, त्याचा अभ्यासू आढावा या पुस्तकात आहे.
* भाग्य आम्ही तुका देखियला (अभय टिळक).
* मंगळवेढय़ाची मांदियाळी (अप्पासाहेब पुजारी) या चरित्रग्रंथात संत [[कान्होपात्रा]], कर्ममेळा, निर्मळा, बंका, दामाजीपंत यांच्या दुर्मीळ चरित्र-काव्याचा विस्तृतपणे परिचय होतो.
* संत शेख महंमद महाराज (अनिल सहस्रबुद्धे). या ग्रंथात भागवत धर्म आणि मुस्लीम सूफी तत्त्वज्ञान यांचा महासमन्वय घडवून आणण्याचे लोकोत्तर कार्य करणाऱ्या शेख महंमदांची अत्यंत प्रतिभासंपन्न आणि विठ्ठलभक्तीने ओतप्रोत भरलेली काव्यसंपदा वर्णन केली आहे. ग्रंथात त्यांचे असामान्य कार्य आणि काव्यरचनांचा विस्तृत आढावा घेतला आहे. शेख महंमदांनी भागवत परंपरेतील भक्तीचा प्रसार करण्यासाठी स्वीकारलेला कीर्तनाचा मार्ग, त्यासाठी केलेली भ्रमंती, अभंग आणि लोकरूपकांची रचना यांविषयीची माहिती पुस्तकात आहे.
 
== हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/संत" पासून हुडकले